कारण

कुठे कर्फ्यू, तर कुठे लॉकडाऊन, वाचा नेमका दोघांमधला फरक काय…

2020 साली जेव्हा कोरोनाचा धोका संपूर्ण देशामध्ये वाढू लागला, तेव्हा मार्च महिन्यातच लॉकडाउन लागू करण्यात आला होता.

2020 साली जेव्हा कोरोनाचा धोका संपूर्ण देशामध्ये वाढू लागला, तेव्हा मार्च महिन्यातच लॉकडाउन लागू करण्यात आला होता. लॉकडाऊनमुळे देशातील जवळपास सर्वच गोष्टी ठप्प झाल्या होत्या. रेल्वे, बस, विमान, शाळा-महाविद्यालयांपासून दुकाने, कार्यालये अशी सगळी कामे रखडली होती. (What is the difference between curfew and lockdown?)

वाहतूक यंत्रणा रखडल्याने अनेकजणांनी आपल्या घरी जाण्यासाठी पायी जाण्याचा निर्णय घेतला होता. यावर्षी त्याच वेळी पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे, त्यानंतर सरकार बाधित भागात लॉकडाउनच्या ऐवजी कर्फ्यू / नाईट कर्फ्यू पर्यायांची अमलबजावणी करत आहे.

मात्र या लॉकडाऊन आणि कर्फ्यूमधील नेमका फरक काय हे अनेकांना माहिती असणे गरजेचे आहे. माजी आयपीएस अधिकारी यशोवर्धन आझाद (Former IPS Officer, Yashovardhan Azad) यांनी लॉकडाऊन आणि कर्फ्यूमधील फरक सांगितला आहे.

लॉकडाऊन म्हणजे काय? (What is a lockdown?)

1897 साली भारतात आलेल्या महामारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ब्रिटीशांनी भारतात Epidemic Diseases Act (महामारी अधिनियम कायदा) लागू केला होता. देशात एखादी महामारी पसरली असेल, तर लॉकडाऊनचा कायदा लागू करण्याचा अधिकार संबंधित सरकारला आहे.

साथीच्या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी, त्याचा फैलाव रोखण्याचा प्रयत्न लॉकडाऊन लावून सरकार करू शकते. या लॉकडाऊनमध्ये काही तात्पुरते निर्बंध लादले जातात. या तात्पुरत्या निर्बंधांतर्गत सरकार काही दिवस बस, गाड्या, विमान, शाळा-महाविद्यालये, दुकाने, कार्यालये इत्यादी गोष्टी बंद ठेवू शकते.

 कर्फ्यू म्हणजे काय? (What is a curfew)

आपल्या देशात क्रिमिनल प्रोसीजर कोड नावाची कायदेशीर प्रक्रिया राबवली जाते. याचाच दुसरा अर्थ कलम 144 लागू करणे होय. या कायद्याचा अधिकार एखाद्या राज्याला किंवा जिल्हाधिकाऱ्यांना असतो. जर कोणतीही परिस्थिती हाताळण्याच्या बाहेर झाली असेल, तर त्याठिकाणी कलम 144 लावला जातो. कर्फ्यूमध्ये लोकांना सक्तीचे घरात बंदिस्त राहण्याचे आदेश दिले जातात. प्रशासनाकडून केवळ आत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा केला जातो, तसेच नागरिकांना बाहेर फिरण्यास मज्जाव केला जातो.

घराबाहेर सार्वजनिक ठिकाणी 5 हून अधिक लोकांना एकत्र एण्यावर बंदी घातली जाते. लॉकडाऊनप्रमाणे अनेक गोष्टींची सूट कर्फ्यूमध्ये दिली जात नाही. तर नागरिकांपेक्षा परिस्थिती नियंत्रणात आणण्यावर अधिक भर दिला जातो. त्यामुळे कर्फ्यू किंवा कलम 144 सारख्या गोष्टी देशामध्ये अनेकदा कमीप्रमाणात लावल्या जातात.

जम्मू आणि काश्मिरमधील नागरिकांना मात्र अनेकदा या गोष्टींचा सामना करावा लागतो, मात्र कोरोनाच्या भयावह परिस्थितीमुळे संपूर्ण देशात या परिस्थितींचा आणि कलमांचा वापर सर्रासपणे केला जात आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments