Video : Vantas Explainer । Corona पेक्षा भयंकर आजारातून वाचवणारे Dr. Haffkine नेमके आहेत कोण?
जगप्रसिद्ध अशा मुंबईतील हाफकिन इन्स्टिट्यूटचा इतिहास आपण मागील भागात पाहिला आहे. आजच्या भागात आपण हे इन्स्टिट्यूट स्थापन करणाऱ्या डॉ .हाफकिन यांच्याबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत.

डॉ. वाल्डेमार मॉर्डेकाई वूल्फ हाफकीन हे एक रशियन सूक्ष्म जंतुशास्त्रज्ज्ञ होते. हाफकीन हे यहूदी धर्मीय होते. ते पटकी आणि ब्युबॉनिक प्लेग म्हणजेच गाठीचा प्लेगवर लस बनवणारे आणि त्यांची तपासणी करणारे पहिले सूक्ष्मजंतुशास्त्रज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. (Dr. who saves from a disease worse than corona, Who exactly is Haffkine?)
हाफकीनने प्लेगच्या लसीचा शोध लावण्याचे आव्हान स्विकारले आणि काही महिन्यात जशी हवी तशी प्राथमिक लस बनवली. या लसीचा पहिला प्रयोग हाफकीनने 10 जानेवारी 1897 रोजी स्वतःवरच केला. लसीमुळे कुठलाही अपाय न झाल्याने ही लस सुरक्षित आहे असे समजून लोकांना टोचण्यास सुरुवात केली. आणि खरोखरच पुण्या-मुंबईतल्या प्लेगची साथ आटोक्यात आली. या लसीमध्ये कालांतराने सुधारणा होत राहिल्या.
पुढे 10 ऑगस्ट 1899 रोजी गव्हर्नर लॉर्ड सँडहर्स्ट (Governor Lord Sandhurst) यांनी परळ येथील एकेकाळी मुंबईच्या गव्हर्नरांना राहण्यासाठी असलेला महाल डॉ. वाल्डेमार मॉर्डेकाई हाफकीन यांच्या स्वाधीन केला. तेथे डॉ. हाफकीनने ‘प्लेग रिसर्च लॅबॉरेटरी'(Plague Research Laboratory) स्थापन केली आणि स्वतः हाफकीन त्या संस्थेचे प्रमुख संचालक झाले. (Who exactly is Haffkine)