भुक्कड

आता फक्त जिवंत राहायचं, WHO ने सादर केली खाण्यापिण्याची यादी

आरोग्याची विशेष काळजी घेण्यासाठी WHO ने बनवली आहे खाण्यापिण्याची यादी.

कोरोना विषाणूची दुसरी लाट अतिशय वेगाने पसरत असल्याने आरोग्याची विशेष काळजी घेणे महत्त्वाचे झाले आहे. यासाठी योग्य आहार आणि नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे. काय खावे, काय खाऊ नये याबद्दल WHO ने एक लिस्ट बनवली आहे.

पाणी शरीरासाठी खूप महत्त्वाचे असते. पाणी शरीराचे तापमान नियमित करते आणि शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते. त्यामुळे सकाळी उठल्यावर उपाशीपोटी किमान दोन ग्लास तरी पाणी प्यावे व दररोज पूर्ण दिवसात आठ ते दहा ग्लास पाणी प्यावे. त्याचबरोबर लिंबूपाणी, इतर फळांचा रस देखील घ्यावा. सॉफ्ट ड्रिंक्स, कोल्ड ड्रिंक्स, कॉफी, चहा या गोष्टींचे प्रमाण कमी करावे.(World Health Organization intruduced food list)

या काळात विविध प्रकारची ताजी फळे व भाज्यांचा आपल्या आहारात समावेश केला पाहिजे. तसेच खनिजयुक्त पदार्थ, फायबर प्रथिने जास्तीत जास्त मिळतील असे पदार्थ खाल्ले पाहिजे.बाहेरचे खाणे टाळावे. फास्ट फूड, फ्राईडफफुड, फ्रोजन फुड, पिझ्झा, कुकीज आणि क्रीम या काळात खाणे टाळले पाहिजे.

फळे, भाज्या, कडधान्ये, शेंगदाणे, बाजरी, मका, सोयाबीन, गहू, ओट्स, ब्राउन राईस, बटाटे, रताळे यासारख्या भाज्या देखील आहारात घ्याव्या. दररोज कमीत कमी दोन फळे खावी. दोन कप भाज्या, धान्य मांस खावे. कच्च्या भाज्या आणि ताजी फळे खावी. आठवड्यातून एक ते दोन वेळा मांस खावे.

मासे, लोणी, नारळ तेल, मलई, चीज, अशा पदार्थांचा आहारात चुकूनही समावेश करू नये. लाल मासा ऐवजी पांढरे मांस खावे. हृदयरोग, स्ट्रोक, मधुमेह, कर्करोग टाळण्यासाठी साखर आणि जास्त प्रमाणात मीठ खाणे टाळणे. दिवसभरात शक्यतो एक चमचाच मीठ खावे.

रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी विटामिन ए सी डी आणि इ यांचा जास्तीत जास्त समावेश आपल्या आहारात असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर व्यायामामुळे देखील रोगप्रतिकारशक्ती वाढते व तणावाचे प्रमाण देखील कमी होते.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments