खूप काही

Chanakya Niti: चाणक्याच्या मते वाईट काळामध्ये जो आपली मदत करतो तोच खरा मित्र…

चाणक्य म्हणतात मित्र तोच असतो जो वाईट काळात मदत करतो.

चाणक्य नीति : चाणक्यच्या मते, आपण नेहमी सावधगिरी बाळगणे खूप गरजेचे आहे आणि संसाधनांचा अत्यंत काळजीपूर्वक उपयोग केला पाहिजे. ज्या लोकांना त्यांच्या भविष्याची चिंता नसते,व जेव्हा त्यांच्यावर वाईट वेळ येते तेव्हा ते उगाचच त्रास घेत असतात.पण त्याच वेळी, जे लोक भविष्याविषयी सतर्क असतात त्यांना वाईट काळात जास्त त्रास सहन करावा लागत नाही.

चाणक्य (Chanakya)हे अर्थशास्त्रातदेखील विद्वान होते. आयुष्यात पैशाचा उपयोग म्हणजे काय हे चाणक्याला चांगलेच माहित होते. चाणक्यच्या मते, संपत्ती हे एक साधन आहे ज्याद्वारे आपले जीवन सोपे होऊ शकते. शारीरिक जीवनात पैशाला(money) विशेष महत्त्व आहे. पैशामुळे जीवनाची भौतिक आवश्यकता पूर्ण होण्यास मदत होते. म्हणूनच पैशाचा उपयोग हुशारीने केला पाहिजे.जे लोक पैशाचा योग्य वापर करीत नाहीत, त्यांना संकटकालीन परिस्थितीत अडचणींचा सामना करावा लागतो. चाणक्य (Chanakya) म्हणतात आपण संपत्ती साठवण्यावर भर दिला पाहिजे.जे लोक पैसे वाचवतात ते सहजपणे वाईट वेळा पार करण्यास सक्षम असतात. म्हणून, पैशाची बचत करण्याच्या दिशेने प्रयत्न केले पाहिजेत. उत्पन्नापेक्षा जास्त पैसे खर्च करणारे लोक नेहमीच काळजीत असतात.

चाणक्य यांच्या म्हणण्यानुसार, जसा दिवस आणि रात्र आहे,तशाच प्रकारे जीवनात आनंद आणि दु:ख असते. आनंदाच्या वेळी घेतलेली खबरदारी ही दु:खाचे क्षण सहज घालविण्यात मदत करते. जेव्हा वाईट वेळ येते तेव्हा नातेवाईक देखील एकत्र राहतात. खरा मित्र फक्त वाईट काळात(bad time) ओळखला जातो. पैसा हा वाईट काळातल्या माणसाचा खरा मित्र असतो.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments