फेमस

69व्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत अॅडलाईन कॅस्टेलीनोने साडीमध्ये केले भारताचे प्रतिनिधित्व

अॅडलाईन कॅस्टेलीनो 69व्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत साडीमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले.

सोमवार, 17 मे रोजी फ्लोरिडाच्या मियामी येथे 69 वी मिस युनिव्हर्स स्पर्धा आयोजित केली होती आणि याचे व्हूट(voot) सिलेक्टवर थेट प्रक्षेपण केले गेले . या स्पर्धेत गाउन फेरीपासून ते बिकिनी फेरीपर्यंत आणि नंतर राष्ट्रीय पोशाख फेरीत या तरुण सौंदर्यवतींनी आपल्या सौंदर्याने आणि बुद्धिमत्तेने जगाला आश्चर्यचकित केले .राष्ट्रीय पोशाख फेरीत ग्लिट्ज आणि ग्लॅमर आणणे अत्यंत आवश्यक होते, जिथे प्रेक्षकांनी जगभरातील वेगवेगळ्या डिझाइनर्सच्या राष्ट्रीय वारसा आणि संस्कृतीचे उत्तम प्रदर्शन पाहिले.

अ‍ॅडलाईन कॅस्टेलिनो(Adeline Castelino)हि 69व्या मिस युनिव्हर्समध्ये भारताचे प्रतिनिधित्व करीत होती आणि यावेळी ती 6 यार्डच्या सुंदर साडीमध्ये दिसुन आली.हैदराबादमधील डिझायनर श्रावण कुमार यांनी डिझाइन केलेली सुंदर आणि नितांत साडी हि ज्ञान आणि अध्यात्माचे प्रतीक असलेल्या कमळ या भारताच्या राष्ट्रीय पुष्पप्रेरणाने प्रेरित झाली. साडीची किनार व पदर भरतकामाने सजविण्यात आला असून यामध्ये तीनशे वर्ष जुन्या पिच्छाई कलेचा प्रभाव दिसून आला .(69th Miss Universe)

डिझायनर श्रवण कुमार यांनी सांगितले की, 6 मीटरची ही साडी खूपच सुंदर असून त्यात एक वेगळीच जादु आहे. ही साडी आपल्या भारतीय संस्कृतीला खूप सुंदरपणे प्रदर्शित करते. 5 महिन्यांपासून साडीवरील नक्षीचे काम सुरू होते. कमळाचा रंग आणि स्त्रियांची आभा यामुळे श्रवण कुमार यांना ही साडी डिझाइन करण्याची प्रेरणा मिळाली. साडीच्या सभोवताली एका मोराच्या डोळ्याचा तपशील दिला आहे. श्रवण कुमार म्हणाले की त्यांना आनंद आणि अभिमान आहे की अॅडलिनने जागतिक स्तरावर भारतीय स्त्रियांचे खरे सौंदर्य उत्तम रीतीने प्रस्तुत केले.

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments