फेमस

Ajit Khan Biography : मुंबईत सिमेंटच्या पाईपमध्ये झोपून काढले दिवस, नंतर बनला खलनायकांचा ‘लॉयन

हिंदी सिनेमांचा सिंह म्हणून ज्यांची ओळख आहे, अशा भारतीय चित्रपट सृष्टीतील खलनायकाच्या भूमिकेसाठी अजित यांचे महत्वाचे स्थान होते

Ajit Khan Biography :

प्रत्येकाला पिक्चरमध्ये हिरोला पाहायला आवडते, पण भारतीय चित्रपटसृष्टीने सिनेमा प्रेमींना एकापेक्षा जास्त खलनायक दिलेत, ज्यामुळे असे अनेक अभिनेते फेमस झाले. अशाच एका खलनायकाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

हिंदी सिनेमांचा सिंह म्हणून ज्यांची ओळख आहे, अशा भारतीय चित्रपट सृष्टीतील खलनायकाच्या भूमिकेसाठी अजित यांचे महत्वाचे स्थान होते. लोकप्रिय बॉलीवूड चित्रपटांमध्ये अभिनेत्याची भूमिकाही यांनी चोख पार पाडली आहे. नास्तिक, बडा भाई, मिलन, बिरादरी. जवळ जवळ चार दशकात त्यांनी दोनशे चित्रपटांमध्ये काम केले आहे.

अभिनेता होण्याआधी ते कुठे राहायचे?

त्यांच्या फार कमी चाहत्यांना अजित खान यांच्याबद्दल माहिती नसेल की अभिनेता होण्याआधी ते कुठे राहायचे?

अजित खान सगळ्यात आधी मुंबईला आले तेव्हा त्यांच्यावर सिमेंटच्या पाईपमध्ये राहण्याची वेळ आली होती. हमीद अली खान असं त्यांचं पूर्ण नाव आहे. सिनेमासृष्टीत अभिनय करण्यासाठी त्यांनी मुंबई गाठली, पण त्यांना राहण्याची जागा उपलब्ध नव्हती, त्यासाठी ते सिमेंटच्या पाईपमध्ये राहत होते, मात्र त्यासाठीही त्यांना दर आठवड्याला पैशे द्यावे लागत होते, जर एखाद्यावेळी पैसे नाही दिले तर तिथून त्यांना काढून टाकले जात असे. एकवेळ त्यांनी स्थानिक गुंडांना पैशे देण्यास नकार दिला होता, त्यावेळेस दोघांमध्ये मारहाण झाली होती. या लढ्यात अजितने गुंडांना हरवले. मग अजितला कशाची भीती वाटली की लोक त्याला मोफत खायला देऊ लागले.

खडतर प्रवासानंतर सिनेमा सृष्टीत एन्ट्री

1940 मध्ये अजित यांनी आपल्या चित्रपट सृष्टीत प्रवास सुरू केला, पहिल्या चित्रपटाचे नाव शाही मिश्रा होते चित्रपटांमध्ये नायक म्हणून काम केलं, परंतु तेथे काही यश मिळाले नाही, त्यांची खलनायकाची भूमिका चाहत्यांना खूप आवडली. सुरज या चित्रपटातून खलनायक ही भूमिका केली आणि त्यांनी प्रसिद्धी मिळवली, या चित्रपटानंतर संपूर्ण शहरात अजित यांना सिंहाच्या नावाने ओळखले जायचे. पुढील आयुष्यात त्यांना अनेक चित्रपटात यश आले आणि सर्व चित्रपटांमध्ये त्यांनी यश मिळवण्यास सुरुवात केली.

मोना डार्लिंग आणि डॉन बीसील सारखे त्यांचे संवाद अजूनही आपल्याला ऐकू येतात. राजा और रंक, प्रिन्स, जीवन मृत्यू, धरती, जंजीर, यादो की बरात, कहानी किस्मत की, खोटे नाणे, चरण, हमसे कम नही, देश परदेश अशा अनेक चित्रपटांत नंतर त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला.

खलनायकाचे विवाह

या खलनायकाने आपल्या आयुष्यात तीन लग्न केली होती, पहिले लग्न प्रेमविवाह होतं, परंतु जाती-धर्माला विरोध असल्याने ते लग्न मोडले, त्यानंतर दुसरे लग्न झाले त्यांना तीन मुले होती परंतु पत्नीच्या मृत्यूनंतर अजित यांनी तिसरे लग्न सारा यांच्याबरोबर केले त्यांना दोन मुले आहेत.

पाच दशक होऊनही वेगळ्या अभिनयाची शैलीसाठी अजित यांना चित्रपटसृष्टीत कधीच विसरता येणार नाही, परंतु 22 ऑक्टोबर 1998 रोजी मुळगावी हैदराबाद येथे त्यांचे निधन झाल

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments