फेमस

KBC : अमिताभ बच्चन घेऊन येणार ‘कौन बनेगा करोडपतीचा तेरावा सिझन’ तर या तारखेपासून नोंदणीला सुरवात…

कौन बनेगा करोडपती 13 वा सीझन सोनी टीव्हीवर लवकरच परत येणार.

पुन्हा एकदा बॉलिवूडचा सम्राट अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) देशातील सर्वात मोठा रीयालिटी शो कौन बनेगा करोडपती ( Kaun Banega Crorepati ) घेऊन येत आहेत. सोनी टीव्हीने (Sony Tv) शेअर केलेल्या प्रोमोमध्ये आपण पाहतो की अमिताभ बच्चन प्रेक्षकांना सांगत आहेत, तुमच्या आणि तुमच्या स्वप्नांमध्ये किती अंतर आहे याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? फक्त तीन अक्षरे, प्रयत्न करा. तर, आपली स्वप्ने सत्यात उतरण्यासाठी फोन उचला आणि तयार व्हा कारण केबीसी13(KBC13) ची नोंदणी 10 मे ( 10 may )पासून सुरू होत आहे.


KBC 12 च्या सीझन नंतर ‘कौन बनेगा करोडपती’ (Kaun Banega Crorepati 13) सोनी टीव्हीवर लवकरच परत येणार आहे. केबीसी नेहमीच जुलैमध्ये प्रसारण करत असते, परंतु यावेळी कोरोनाच्या साथीमुळे शोचा मागील हंगाम सप्टेंबर ऐवजी जुलै महिन्यात अगदी उशीरा सुरू झाला. 13 वा सीझन हा ऑगस्टच्या आसपास देखील सुरू होऊ शकतो. सध्या सर्व मोठे रियालिटी शोज मुंबईत शुटिंग सुरू होण्याची वाट पाहत आहेत.

शो प्रेक्षकांशिवाय सुरू  :
मागील वर्षी केबीसीचे शूट कोणत्याही प्रेक्षकांविना करण्यात आले होते. यावर्षी देखील परिस्थिती सुधारली नसल्यामुळे शूटिंग प्रेक्षकांशिवाय करण्यात येईल. मागील हंगामाप्रमाणे यावेळेसदेखील प्रेक्षकांच्या मतदानाऐवजी व्हिडीओ कॉल फ्रेंड लाइफलाईन देण्यात येईल आणि या संपूर्ण प्रवासामध्ये स्पर्धकांना 15 प्रश्न दिले जातील. या प्रश्नांची अचूक उत्तरे देऊन स्पर्धक 7 कोटी रुपये जिंकून लक्षाधीश होऊ शकतात.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments