कारण

अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ? याचिकेवर 6 मे रोजी सुनावणी…

गुन्हा रद्द करण्यासाठी अनिल देशमुख यांनी केलेल्या याचिकेवर 6 मे रोजी होणार सुनावणी

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात सिबीआय(CBI) ने गुन्हा दाखल केला आहे.या गुन्ह्यात पदाचा दुरुपयोग केल्याचे कलम लावण्यात आले आहेत.

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख(Anil Deshmukh) यांच्या विरोधात तक्रार केली होती. त्या तक्रारीत देशमुख यांनी 100 कोटी रुपयांच्या वसुलीच टार्गेट सचिन वाझे यांना दिल होत,असा आरोप केला होता.पुरावे नष्ट होण्याआधी या प्रकरणाची नि:पक्षपाती चौकशी करण्यात यावी असं परमबीर यांनी म्हटलं आहे.त्या अनुषंगाने जनहित याचिका दाखल झाल्यावर कोर्टाने सिबीआय ला चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

सीबीआयने चौकशी करून गुन्हा दाखल केला आहे.

त्यानंतर सीबीआयने अनेक ठिकाणी धाड सत्र सुरू करून कारवाई सुरू केली होती.पोलीस महासंचालकांनी ही माहिती राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव यांना दिली. टेलिफोनिक इंटरसेप्शनच्या आधारे ही माहिती पुढे आली होती.

मुकेश अंबानी प्रकरणी तसेच मनसुख हिरेन हत्याप्रकरणी यांचा सहभाग स्पष्ट हेत असताना त्याचे धागेदोरे परमबीर सिंग यांच्यापर्यंत पोहचणार असल्याचं तपासातून स्पष्ट होत असताना परमबीर सिंग यांनी स्वतःला वाचवण्यासाठी आणि कारवाईपासून वाचण्यासाठी खोटा आरोप केला आहे’, अशी अनिल देशमुख यांनी आपली बाजू ट्वीटरवर मांडली आहे.
सीबीआयने दाखल केलेला हा गुन्हा रद्द करण्यासाठी अनिल देशमुख यांनी मुंबई हायकोर्टात याचिका केली आहे. या याचिकेवर आता गुरुवारी, 6 मे रोजी सुनावणी होणार आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments