खूप काही

PUBG Mobile India मध्ये बदल करून नवा गेम येणार, येण्याआधीच बंद करण्याची मागणी

भारत आणि चिन यांच्यात झालेल्या वादाचा परिणाम म्हणून PUBG या लोकप्रिय गेमवर बंदी घालण्यात आली होती

PUBG Mobile India भारत आणि चिन यांच्यात झालेल्या वादाचा परिणाम म्हणून PUBG या लोकप्रिय गेमवर बंदी घालण्यात आली होती, मात्र हाच PUBG पुन्हा भारतात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अरुणाचल प्रदेशमधील काँग्रेसचे आमदार निनाँग एरिंग (Congress MLA Ninang Ering) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना एक पत्र लिहलं आहे, PUBG मोबाईलमध्ये गेममध्ये बदल करून भारतात लाँच होणारा बॅटलग्राउंड मोबाईल गेमविरोधात एरिंग यांनी आवाज उठवला आहे.

(PUBG) पीयूबीजी मोबाइल इंडियाचा नवा अवतार बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया हा सरकारसह नागरिकांना फसवण्याच्या प्रयत्न आहे. त्यामुळे चिनी कंपनीने तयार केलेल्या गेमवर भारतात बंदी घालण्यात यावी, अशी मागणी निनॉंग एरिंग यांनी पंतप्रधानांकडे केली आहे.

नव्याने येणाऱ्या गेममुळे भारतीय कायद्यांचा भंग होत असल्याचा काँग्रेस आमदारांनी केलं आहे. बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडियाची लाँचिंग तारीख अद्याप निश्चित केलेली नाही, जरी दक्षिण कोरियन कंपनीने या गेमसाठी गुगल प्ले स्टोअरकडे पूर्व-नोंदणी केली आहे. त्यामुळे काही दिवसांमध्ये हा गेम भारतातही येऊ शकतो.

PUGB गेममध्ये किरकोळ बदल करुन पुन्हा सुरू करायचा आणि आमच्या मुलांसह आमच्या कोट्यावधी नागरिकांचा डेटा गोळा करून तो परदेशी कंपन्यांकडे आणि चीनी सरकारकडे हस्तांतरित करायचा, असा उद्देश या चिनी कंपनीचा असल्याची माहिती आमदारांनी केलेल्या पत्रात म्हटलं आहे. त्यांनी ट्विटरवर त्यांच्या तीन पानांच्या पत्राचीही एक प्रत पोस्ट केली आहे. (Ban pugb mobile relcaunch as a PUBG Mobile India MLA writes PM modi a letter)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments