फेमस

Actor sunil dutt life : बस कंडक्टर ते लाखो दिल की धडकन, वाचा या अभिनेत्याचा भन्नाट प्रवास

अभिनेता, निर्मिता आणि दिग्दर्शक अशी कामगिरी करणाऱ्या सुनील दत्त यांनी आपल्या कारकीर्दीत अनेक चमकदार चित्रपट बनवले.

Actor sunil dutt life : अभिनेता, निर्मिता आणि दिग्दर्शक अशी कामगिरी करणाऱ्या सुनील दत्त यांनी आपल्या कारकीर्दीत ‘मदर इंडिया’, ‘पडोसन’, ‘नागिन’, ‘हमराज’ आणि ‘खंदन’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये चमकदार काम केले आहे. तसेच अनेक पंजाबी चित्रपटांमध्येही त्यांनी भूमिका केली आहे. (actor sunil dutt life unknown facts worn in btc bus)

सुनील दत्त यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत एक मोठे स्थान मिळवले होते. त्यांचे अभिनय वास्तविक जीवनाशी अगदी जवळचे होते, त्यामुळे सामान्य व्यक्तीही त्यांच्या कलेशी जोडला जायचा.

सुनील दत्त हे अभिनेता होण्यापूर्वी रेडिओ जॉकी होते. त्यांच्या फार कमी चाहत्यांना हे माहीत असेल की रेडिओ मध्ये काम करण्यापूर्वी ते काय करात होते. आज त्यांच्या जीवनाशी संबंधित तोच पैलू तुमच्याबरोबर मांडण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.

रेडियो जॉकीच्या आधीचा खडतर प्रवास

रेडिओमध्ये काम करण्यापूर्वी सुनील दत्त यांना दोन वेळेचं अन्न मिळवण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत असे. गोष्ट त्या दिवसांची आहे, जेव्हा सुनील दत्त मुंबईत एकटेच राहत होते आणि अभ्यास करत होते. त्यांनी शिक्षणासाठी पैसे जमवण्यासाठी मुंबईच्या बसेसमध्ये काम करण्यास सुरवात केली आणि त्यासाठी दरमहा 100 रुपये पगार मिळत असे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunil dutt (@sunil_duttsab)

सुनील दत्तची बीटीसीमध्ये (त्यावेळेचे मुंबई बस डेपो) शिफ्ट दुपारी अडीच ते रात्री 11 या वेळेत होती. ते रोज सकाळी 7 वाजता शाळेत जात असत. शिक्षणाची आवड असलेल्या दत्त यांना परिस्थितीने रितसर शिकू दिलं नाही. घरची परिस्थिती हालाखीची असल्याने ते तेथूनच वाचण्यासाठी ग्रंथालयात जात असत, कारण त्यांच्याकडे ना पुस्तके वाचण्यासाठी किंवा शांतपणे वाचण्याची जागा नव्हती.

शिक्षण पूर्ण करताना ते काम ही करत असत. रोज रात्री बीटीसी येथे आपली शिफ्ट पूर्ण झाल्यानंतर, ते व्हीटी स्टेशनवरून शेवटची लोकल पकडत आणि कुर्ला येथे असलेल्या त्यांच्या घरी येत असत. एवढेच नाही तर ते घरी येऊन स्वयंपाक बनवून जेवत असत आणि त्याच वेळेत दिवसभर घाण झालेले कपडे धुत असत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunil dutt (@sunil_duttsab)

परिस्थितीवर मात करून मिळालेले यश

सुनील दत्त यांच्या आयुष्यात अनेक अडथळे आलेत. मात्र त्यांच्या मेहनतीला नंतर फळ मिळालं. त्यांच्या कठोर परिश्रमातून यश मिळाले आणि सुनील दत्त यांना रेडिओ घोषक म्हणून नोकरी मिळाली. त्या काळात बॉलीवूडमध्ये अनेक अभिनेते मेहनत घेत होते. हळूहळू त्यांचेही नशिब बदलले, त्यानंतर ते एक दिवस बॉलिवूडचे सर्वात मोठे स्टार बनले आणि त्यानंतरची कहाणी सर्वांना ठाऊक आहे. परंतु अशा सर्वगुणसंपन्न असणाऱ्या अभिनेता सुनील दत्त यांचे 25 मे 2005 रोजी मुंबईतील पाली हिल, वांद्रे इथल्या त्यांच्या राहत्या घरी निधन झाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sanjay Dutt (@duttsanjay)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments