खूप काही

BHC recruitment 2021: मुंबई उच्च न्यायालयात नोकरीची सुवर्णसंधी, जाणून घ्या अधिक माहिती…

मुंबई उच्च न्यायालयाने 40 पदांच्या भरतीसाठी सूचना जाहीर केली आहे

BHC Recruitment 2021: महाराष्ट्रात सरकारी नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी एक चांगली बातमी आहे. मुंबई उच्च न्यायालयाने (BHC-Bombay High Court) महाराष्ट्र राज्यातील जिल्हा आणि तालुका न्यायालयांच्या रिक्त पदांच्या भरतीसाठी सुचना जाहीर केली आहे . या सूचनेनुसार , कॉन्ट्रॅक्टच्या आधारावर सिनिअर सिस्टम ऑफिसर आणि सिस्टम ऑफिसरच्या पदांसाठी भरती केली जाणार आहे .
यात एकूण 40 पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात येईल (BHC Recruitment 2021). अर्ज करण्यासाठी आगाऊ 27 मे 2021 पर्यंत वेळ देण्यात आला आहे .
तारीख निघून गेल्यानंतर उमेदवारांना कोणत्याही पदासाठी अर्ज करता येणार नाही .इच्छुक उमेदवारांनी bombayhighcourt.nic.in या या वेबसाईटवर जाऊन संबंधित पदासाठी अर्जपाठलण्याची सोय केली आहे.

BHC भरती 2021 रिक्त पदांची माहिती-

मुंबई उच्च न्यायालयाने (BHC)ने जाहीर केलेल्या सूचनेनुसार, इच्छुक उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी bombayhighcourt.nic.in या वेबसाईटवर जावे लागेल. (BHC Recruitment 2021) एकूण 40 पदांसाठी निवड करण्यात येईल यातील 17 पदे ही सिनियर सिस्टीम ऑफिसर साठी असतील तर ते 23 पदे ही सिस्टीम ऑफिसर साठी असतील.

सैलरी डिटेल्स (salary details) –

सिनिअर सिस्टम ऑफिसर- 46,000 रुपये

सिस्टम ऑफिस- 40,000 रुपये

कोण अर्ज करू शकतात?

मुंबई उच्च न्यायालयाने(Bombay highcourt) जाहीर केलेल्या सूचनांनुसार सीनियर सिस्टीम ऑफिसरसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कम्प्युटर सायन्स इंजीनियरिंग आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा इलेक्ट्रॉनिक इंजिनीअरिंगची पदवी असणे आवश्यक आहे . त्याच बरोबर उमेदवारांकडे कम्प्युटर सायन्स इंजीनियरिंग आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इंजीनियरिंग मधील बीई बीटेकची पदवी असणे आवश्यक आहे त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचे म्हणजे अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 40 वर्षांपेक्षा कमी असणे गरजेचे आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments