लग्नसमारंभात 25 च्या जागी 150 लोक उपस्थित… बीएमसीने ठोठावला 50 हजार रुपयांचा दंड..
लग्नसमारंभात नियमांचे उल्लंघन केल्यामुळे केली कारवाई..

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लग्नसमारंभासाठी देखील काही नियम लागू केले आहेत. राज्यात कोरोनाचा प्रकोप बघता सरकारने ‘ब्रेक द चैन’साठी मॅरेज हॉलमधील सोशल डिस्टंसिंग त्याचबरोबर लग्नाची वेळ दोन तास केली असून फक्त 25 माणसांची परवानगी दिली आहे.
मुंबई महानगरपालिकेने मुंबईमधील एका हॉलवर नियमांचे उल्लंघन केल्यामुळे 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. या सभागृहाच्या मालकावर आणि विवाह नियोजकावर ग्रामदेवी पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.(BMC imposed a fine of Rs 50,000 for violating the rules at the wedding)
मुंबईमधील संस्कृती हॉलमध्ये होत असलेल्या विवाह कार्यात 150 लोक सहभागी होते. हॉलमध्ये कोणीही सोशल डिस्टन्सिंगचे पालन करताना दिसत न्हवते. तर काही लोकांनी मास्क देखील लावला नव्हता. याची माहिती मिळताच बीएमसीने संस्कृती हॉल वर छापा मारला.
बीएमसीच्या ‘डी’ विभागामधील प्रशांत गायकवाड यांनी सांगितले की, कोरोना वायरसच्या वाढत्या संक्रमणामुळे सरकारने अनेक नियम लागू केले आहेत. परंतु नियमांचे उल्लंघन केले जाते.नियमांचे उल्लंघन केल्याने बीएमसीने कडक कारवाई केली आहे.