आपलं शहर

60 दिवसांत सगळ्यांना लस, BMC ची मोहिम फत्ते, ग्लोबल टेंडर पास, वाचा संपूर्ण माहिती

BMC ने लसीकरणाची गती वाढविण्यासाठी ग्लोबल टेंडर काढलं आहे. 'स्पुतनिक व्ही'लसीचा उत्तम प्रतिसाद मिळू लागल्यानंतर ती लस मुंबईत आणण्यासाठी पालिकेचे प्रयत्न सुरु आहेत.

बृहन्मुंबई महानगर पालिकाने (BMC) लसीकरणाची गती वाढविण्यासाठी जागतिक निविदा (Global tender) काढली आहे. ‘स्पुतनिक व्ही’लसीचा (Sputnik V vaccine) उत्तम प्रतिसाद मिळू लागल्यानंतर ती लस मुंबईत आणण्यासाठी पालिकेचे प्रयत्न सुरु आहेत.

सध्या मुंबई पालिकेने तीन कंपन्यांकडून 1 कोटी कोरोना लस निवीदा पास केली आहे. या जागतिक निविदेमध्ये फायझर आणि मॉडर्नसारख्या जागतिक दर्जाच्या लसींचा समावेश आहे.

लस आयात करण्यासाठी 7 अब्ज खर्च
परदेशातून लसींची आयात करणारे मुंबई हे देशातले पहिले शहर आहे. लस आयात करण्यासाठी बीएमसीकडून सुमारे 7 अब्ज रुपये खर्च केले जाणार असल्याची माहिती पालिका आयुक्त इक्बालसिंग चहल (Iqbal Singh Chahal) यांनी दिली. (7 billion spent for vaccine import)

मुंबईत लसीकरण 60 दिवसात पूर्ण
मुंबईतील अनेक लसीकरण केंद्रावर लसींचा साठा संपत असल्याने अनेकांना नाराज व्हावं लागत आहे, अनेकजणांचे रजिस्ट्रेशन होऊनदेखील लस न मिळाल्याची उदाहरणे आहेत, त्यामुळे सर्व मुंबईकरांना लस मिळावी, यासाठी पालिकेने हा मोठा निर्णय घेतला आहे, येत्या 60 दिवसांत मुंबईतील सर्व नागरिकांना कोरोनाची लस जलद गतीने दिली जाईल, त्यामुळे मुंबईत तिसऱ्या लाटेची शक्यता भासणार नाही, अशी माहितीदेखील चहल यांनी दिली. (vaccination in Mumbai completed in 60 days)

18 ते 44 वयोगटातील नागरिकांनाही मिळणार लस
इक्बाल सिंह चहल यांच्या मते मुंबईत 18 ते 44 वयोगटालील साधारण 50 लाख नागरिक आहेत, त्या सर्वांचे लसीकरण करायचं झाल्यास 1 करोड लसींची आवश्यकता आहे. त्यासाठी लंडनमधील तालिसिन इंटरनॅशनल लिमिटेड आणि हैदराबादमध्ये असलेल्या इतर दोन कंपन्यांकडून टेंडर पास करण्यात आलं आहे. या तिन्ही कंपन्या स्पुतनिक लसीचे वितरण करत आहेत, अशी माहितीही चहल यांनी दिली. (ages of 18 and 44 will also get the vaccin)

ग्लोबल टेंडरमध्ये इतर कंपन्यांचाही समावेश
टेंडर भरण्याची शेवटची तारीख आधी 18 मे होती, आता ती 25 मेपर्यंत वाढवण्यात आली आहे. ही निविदा केवळ स्पुतनिकच नव्हे तर इतर अनेक जागतिक लस उत्पादकांसाठीदेखील असणार आहे. यात फाइजर, जॉनसन आणि जॉन्सन, सीरम, भारत बायोटेक आणि मॉडर्ना या जागतिक दर्जाच्या लसींचादेखील समावेश असणार आहे. (Other companies are included in Global tender)

मुंबईत कोरोना रुग्णांमध्ये घट
मुंबईत कोरोना रुग्णांमध्ये सतत घट होत आहे. एका महिन्यापूर्वी, येथे कोरोना रुग्ण पॉझिटीव्ह होण्याचा दर 31% होता, तर तो दर आता 5 टक्क्यांवर आला आहे. मे महिन्याच्या अखेरीस हा दर 2 टक्क्यांवर जाईल, असा दावा पालिका अधिकाऱ्यांनी केला आहे. (reduction in corona patients in Mumbai)

महाराष्ट्र सरकार 5 कोटी लस खरेदी करणार
मुंबईप्रमाणेच महाराष्ट्र सरकार आंतरराष्ट्रीय बाजारातून 5 कोटी लस खरेदी करणार असल्याची माहिती आहे. राज्य सरकारही पुढील 8 दिवसांत टेंडर काढण्याची प्रक्रिया सुरु करणार आहे. केंद्राकडून परवानगी मिळाल्यानंतर राज्याने निविदा काढल्या आहेत. (Maha gov to buy 5 crore vaccines)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments