मुंबईकरांना दिलासा, काही ठिकाणी धावपळ होणार, पाहा पाऊस कधी येणार
मुंबईत सध्या उष्णतेचं प्रमाण जास्त आहे, मात्र लवकरच यातून मुंबईकर मुक्त होणार आहेत

मुंबईत सध्या उष्णतेचं प्रमाण जास्त आहे, मात्र लवकरच यातून मुंबईकर मुक्त होणार आहेत. सोबतच सर्वांना छत्री किंवा रेनकोटची व्यवस्था करावी लागणार आहे, कारण मान्सुनपूर्व पावसाने गुरुवारी मुंबईत हजेरी लावली आहे. हे मान्सूनपूर्व हवामान लक्षात घेता हवामानशास्त्रज्ञांनी 8 जूनपर्यंत मुंबईत पावसाची हजेरी लागण्याची शक्यता वर्तवली आहे.
चक्रीवादळाच्या पूर्वी आणि नंतरच्या दमट हवामानाने पुन्हा एकदा मुंबईकरांना दिलासा दिला आहे. चक्रीवादळानंतर मुंबईचे किमान आणि कमाल तापमानात वाढ झाली आहे. किमान तापमानात इतकी वाढ झाली आहे की दिवसा आणि रात्रीच्या तापमानात फक्त 5 अंशांचा फरक जाणवू लागला आहे.
प्रादेशिक हवामान खात्याच्या माहितीनुसार गुरुवारी मुंबई शहराचे कमाल तपमान 33 33 अंश डिग्री सेल्सियस आणि उपनगरात 33.8 अंश डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. तर शहराचे किमान तापमान 28.5 डिग्री सेल्सियस आणि उपनगरात 28.5 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहेत. प्रादेशिक हवामान खात्याचे अधिकारी शुभांगी भुतेंनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी सकाळी मुंबई आणि ठाण्यामध्ये पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली होती
हवामान तज्ज्ञ दिनेश मिश्रा यांच्या मते रविवारप्रमाणेच गुरुवारी सकाळीही मुंबईत काही भागात पाऊस पडला. मान्सूनपूर्वचे हे वातावरण असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मुंबईत सकाळी किंवा संध्याकाळी काही भागात हलका पाऊस सुरू होईल आणि 8 ते 9 जून दरम्यान मुंबईत पावसाला सुरुवात होईल, अशी शक्यताही त्यांनी वर्तवली आहे.