आपलं शहर

CIDCO lottery 2021: आनंदाची बातमी, या तारखेला मिळणार सिडकोच्या घरांची चावी

सिडको महागृहनिर्माण योजनेमधील अर्जदारांना 1 जुलै 2021 पासून मिळणार घरांचा ताबा

कोरोनाच्या(covid-19) वाढत्या संख्येमुळे महाराष्ट्रात लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला गेला. लॉकडाऊनमुळे सर्व काम बंद करण्यात आली होती. अनेक विकास प्रकल्प मंदावले होते. सिडको महागृहनिर्माण योजना हा प्रकल्प देखील लॉकडाऊनमुळे थांबला होता. परंतु आत 2018-19 मधील अर्जदारांना 1 जुलै 2019 पासून घराचा ताबा टप्प्याटप्प्याने देण्याचा निर्णय सिडको महामंडळाने घेतला आहे.(cidco lottery update)

लॉकडाऊन जाहीर होताच अनेकांनी मुंबईतून पलायन केले होते. त्यामध्ये अनेक मजुरांचा देखील समावेश होता. त्यामुळे मजुरांचा तुटवडा निर्माण झाला आणि अशा काळात निर्माण झालेल्या आर्थिक संकटाचा सामना सिडकोला देखील करावा लागला.(Good news .. on this date you will get the keys of CIDCO houses)

घरांचे बांधकाम पूर्ण
Covid-19 च्या प्रसारामुळे अनेक विकास कामांना खीळ बसलेली असताना देखील सिडको महामंडळाने सर्व परिस्थितीवर मात करून पुरेसे मजूर गोळा केले. सिडकोतील अधिकार्‍यांना दिवस-रात्र काम करायला लावून या योजनेतील घरांचे बांधकाम पूर्ण करून सर्वसामान्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण केले. नवी मुंबई येथील तळोजा, खारघर, कळंबोली, घनसोली आणि द्रोणागिरी या पाच ठिकाणी सुमारे 25 हजार घरे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अल्पउत्पन्न गट यांकरीता बनवण्यात आलेले आहे.(Construction of houses completed)

शुल्क भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै
सिडको महागृहनिर्माण योजनेतील ज्या अर्जदारांनी घरांचे हप्ते भरले आहेत त्यांना बाकी उरलेले शुल्क भरण्यास 1 जून 2021 पर्यंतची मुदत देण्यात येणार आहे व 1 जूनपासूनच घरांचा टप्प्याटप्प्याने ताबा अर्जदारांना देण्यात येणार आहे. परंतु एकही टप्पा ना भरलेल्यांना 31 जुलै 2019 पर्यंतची मुदत वाढ करून देण्यात आलेली आहे.(The last date to pay the fee is July 31)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments