आपलं शहर

LLM Entrance Exam : परीक्षेत झाला गोंधळ, विद्यार्थ्यांनी उचलला मुंबई विद्यापीठाच्या सिस्टिमवर सवाल…

मुंबई विद्यापीठाच्या एलएलएम (LLM entrance exam) परीक्षेत गोंधळ झाल्याचे विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आले आहे.

मुंबई विद्यापीठाच्या एलएलएम (LLM entrance exam) परीक्षेत गोंधळ झाल्याचे विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आले आहे. डिसेंबर 2020 मध्ये एलएलएम परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत शेवटच्या फेरीमध्ये रिक्त राहिलेल्या जागा लपवल्यामुळे परीक्षेत कमी गुणांच्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.

एलएलएमची प्रवेश परीक्षा का गरजेची

विद्यार्थ्यांनी केलेले हे आरोप विद्यापीठाने स्वीकारले नसून विद्यापीठाकडून सांगण्यात आले की, विद्यार्थ्यांनी सांगितल्यापैकी असा कोणताही गोंधळ झालेला नाही. एलएलएम परीक्षा देण्यासाठी एलएलबी (LLB) असावे लागते. एलएलबी म्हणजेच बॅचलर ऑफ लॉ (Bachelor of law) एलएलबीची डिग्री प्राप्त केल्यानंतर पूढे मास्टर करण्यासाठी एलएलएमची प्रवेश परीक्षा द्यावी लागते. एलएलएम म्हणजे मास्टर ऑफ लॉ (Master of law – The university did not accept the allegations made by the students)

अनेकांना प्रवेश नाही
एलएलएम प्रवेशपरीक्षा डिसेंबर 2020 मध्ये घेण्यात आली होती. विद्यापीठ ही परीक्षा येत्या 2 जूनला घेणार आहे. या परीक्षेची प्रवेशप्रक्रिया ही मागील पाच महिन्यांपासून सुरू होती. परंतु आता प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली असल्याने अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेत प्रवेश मिळालेला नाही. (Many students did not get admission in the exam as the admission process was completed)

कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त
या परीक्षेची सहावी म्हणजेच अंतिम फेरी मागील आठवड्यात घेण्यात आली होती. तेव्हा वेबसाईटवर सुरुवातीला कमी जागा दाखवण्यात आल्या होत्या. मात्र जेव्हा ऑनलाईन व्हीसीमार्फत परीक्षा घेण्यात आल्या तेव्हा पूर्वीपेक्षा जास्त जागा रिक्त दाखवल्या. त्यामुळे परीक्षेमध्ये चांगले गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांपेक्षा कमी गुण मिळालेले विद्यार्थी मोठ्या संख्येने होते असे इतर विद्यार्थ्यांनी सांगितले. (The number of students with low marks is high)

परीक्षा पुढे ढकलावी ही मागणी

अनेक विद्यार्थ्यांना यामध्ये प्रवेश मिळाला नसून 2 जूनला एलएलएम अभ्यासक्रमाची परीक्षा होणार आहे. त्यामुळे शेवटची फेरी परत घेऊन मेरीटनुसार रिक्त जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. त्याचबरोबरही ही परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणीदेखील विद्यार्थ्यांनी कुलगुरू, राज्यपाल यांच्याकडे केली आहे.(Demand to postpone LLM exam)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments