खूप काही

Corona Third Wave : लहान मुलांना मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण, काय आहेत लक्षणं?

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत लहान मुलांमध्ये लक्षणे आढळून आली आहेत,

कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान लहान मुलं किंवा तरुण मुलांमध्ये कोव्हिड- 19 चं प्रमाण फारसं नव्हतं. पण दुसऱ्या लाटेदरम्यान मात्र 18 वर्षांपर्यंतच्या वयोगटातल्या रुग्णांची संख्या वाढली.

कोरोनाची लहान मुलांमध्ये कोणती लक्षणं आढळतात?

1. लहान मुलांमध्ये ताप, घसा खवखवणे, पोट बिघडणे, उलट्या होणे अशी लक्षणे दिसून येतात असे बालरोगतज्ज्ञांचं म्हणणं आहे.

2. बोलू न शकणारी मुले सतत रडत असतील, तर हे त्यांचं अंग दुखत असल्याचं लक्षण असू शकते. यामुळे त्यांना कोरोनाचा धोका निर्माण होऊ शकतो.

3. काही वेगळी लक्षणंही आढळून आली आहेत त्यात तोंडाची चव जाणे, वास येणं थांबणे, मुलांची अन्नावरची वासना अचानक जाणं, त्यांनी खाणं कमी करणं हे याचं लक्षण असू शकतं.

4.बेशुद्ध पडणं, अंगावर पुरळ येणं, डोळे लाल होणं, हाताच्या वा पायाच्या नखांना किंवा बोटांना निळसर झाक येणं. याला ‘कोव्हिड टोज’ (Covid Toes) असं म्हटलं जाते, हीदेखील लक्षणे दिसून येतात.

मुलांची कोव्हिड चाचणी कधी करायची?

जर पालकांपैकी कोणी पॉझिटिव्ह असेल तर ते मूल पॉझिटिव्ह असण्याची शक्यता दाट असते. कारण अगदी लहान मुलं आई-वडिलांच्या आजूबाजूलाच असतात. विशेषतः आईच्या लहान मुलांच्या बाबतीत तर बहुतेक मुलांना वेगळ्या उपचारांची गरज भासत नाही. त्यामुळे त्यांच्या टेस्टिंगची गंभीर गरज नसते.

लहान मुलांची टेस्ट पॉझिटिव्ह आली, तरी त्यांना फार मोठी ट्रीटमेंट लागत नाही. पण मुलांमध्ये लक्षणं दिसत असल्यास त्यांची चाचणी करून घ्यावी.

लहान मुलांमध्ये लक्षणे आढळल्यास कोणती खबरदारी घ्यावी-

मुलांना ताप आला तर त्यांना घरीच ठेवा. हा ताप हवामान बदलामुळे आलेला असू शकतो, पण सोबतच कोरोनाच्या संसर्गाचंही हे लक्षण असू शकतं त्यामुळे ताप उतरल्यावरही त्यांना खेळायला पाठवू नका.

लहान मुलांमध्ये ताप किंवा इतर लक्षणं दिसू लागल्यास, त्याची कागदावर व्यवस्थित चार्ट करून यामध्ये तारीख, वेळ, किती ताप होता, SPO2 (रक्तातील ऑक्सिजन पातळी), पल्स रेट या गोष्टींची दर 7-8 तासांनी अशी दिवसातून साधारण तीन वेळा अशा प्रकारे नोंद ठेवा.

SPO2 वरील ऑक्सिजनची पातळी 94 पेक्षा कमी दाखवत असल्यास तातडीने तुमच्या फॅमिली डॉक्टरना / बालरोग तज्ज्ञांना संपर्क करा.

आजारी पडलेलं मूल 2 वर्षांपेक्षा मोठं असेल, तर त्यांनाही मास्क घालावा. मुलांमध्ये कोरोनाची लक्षणं दिसून येण्याचं प्रमाण वाढलं असलं, तरी मुलं यातून पटकन बरी होत असल्याने घाबरून जाण्याची गरज नसल्याचं डॉक्टर्सचं म्हणणं आहे.

स्तनपान देणारी आई पॉझिटिव्ह झाली तर?
डॉक्टरांशी बोलून त्या महिलेला सौम्य लक्षणे असल्यास मास्क लावून बाळाला स्तनपान देता येईल ,सहा महिन्याच्या बाळाला आईसोबतच क्वारंटाइन करावे. जेणे करून इतरांना बाळाला हाताळावे लागणार नाही आणि संसर्ग रोखता येईल. सर्वात महत्वाचे म्हणजे बाळांमध्ये लक्षणे आढळल्यास आईच्या स्तनपानाद्वारे मिळणाऱ्या पोषणाचे त्यांना कित्येक पटीने जास्त फायदे आहेत.

ही खबरदारी घ्या :

1.डॉक्टरांच्या सल्ल्याने घरच्या घरीच बाळांना मालिश करा.
2.लहान मुलांचे साबण, कंगवे आणि इतर गोष्टी वेगळ्या ठेवा.
3.लहान बाळांना दूध पाजताना, अन्न भरवताना, कपडे बदलण्याआधी हात स्वच्छ धुवून घ्या.
4.मुलांची खेळणी सॅनिटाईझ करा.
मुलांनी वारंवार हात धुवायला सांगा.
5 .मुलांना डॉक्टरांच्या सल्ल्याने पूरक औषधं सुरू करा.मल्टी व्हिटॅमिनची औषधं वा प्रोटीन पावडर देऊ नका.

MIS -C काय आहे?

MIS – C म्हणजे मल्टीसिस्टीम इन्फ्लमेटरी सिंड्रोम इन चिल्ड्रन (Multi Inflammatory Syndrom in Kids).
यात कोव्हिड 19 होऊन गेल्याच्या 2 ते 4 आठवड्यांनंतर लहान मुलांमध्ये या सिंड्रोमची लक्षणं आढळतात. यामध्ये मुलांचे पोट बिघडणं, पोटात दुखणं, उलट्या, अंगावर पुरळ उमटणं, डोळे लाल होणं, ताप येणं, जीभ – घसा लाल होणं अशा गोष्टी आढळतात.याचा प्रामुख्याने हृदय, फुफ्फुसं, किडनी, मेंदू, डोळे, त्वचा, पोटातील आतडी या अवयवांवर परिणाम होऊ शकतो.

MIS – C वर तातडीने उपचार होणं गरजेचं असतं. यासाठी मुलांमध्ये ही लक्षणं आढळल्यास त्यांना पूर्वी कोव्हिड होऊन गेला होता का, घरातलं कोणी कोव्हिड पॉझिटिव्ह होतं का याविषयी डॉक्टरांना सांगणं आवश्यक आहे.

मुलांमध्ये आढळणाऱ्या लक्षणांचा संबंध इतर कोणत्याही विकाराशी लागत नसल्यास तातडीने उपचार करावे लागतात. नाहीतर याचा हृदयक्रिया बंद पडण्यापर्यंतचा परिणाम होऊ शकतो आणि तो जीवघेणा देखील ठरू शकतो.

लहान मुलांना पण लस देणार का?

जगभरात लसींचेउत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी 18 वर्षाखालील वयोगटासाठीच्या लसीच्या चाचण्या सुरू केल्या आहेत.चाचण्यांदरम्यान आपली लस 12 ते 15 वयोगटासाठी 100 टक्के परिणामकारक ठरली असून ही लस घेतल्यानंतर शरीरात चांगली रोगप्रतिकारक शक्ती निर्माण झाल्याचं फायझर कंपनीने मार्च अखेरीस म्हटलं. पण सध्या तरी लहान मुलांना कोरोनासाठीची कोणतीही लस देण्यात येत नाही.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments