आपलं शहर

Corona vaccination update: मुंबईतील सर्व लसीकरण केंद्रे बंद, पालिकेने सांगितले मुख्य कारण…

मुंबईत आज लसीकरण केंद्रे बंद राहतील, महानगरपालिकेने ट्विटद्वारे सांगितले कारण.

Corona vaccination update : देशात कोरोनाचा झपाट्याने प्रसार होतोय. याचवेळेस मुंबईतील लसीकरण केंद्रे (covid 19 vaccination) रविवारी (23 मे रोजी) बंद राहणार आहेत. असे बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) एका ट्वीटद्वारे नागरिकांना सांगितले. आज रविवार असल्या कारणाने लसीकरण केंद्रे बंद राहणार आहेत. याबद्दलची माहिती पालिकेने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. (All vaccination centers in Mumbai closed today, the main reason stated by the BMC)

लसीकरणासंबंधी माहिती देताना महानगरपालिकेने ट्वीटमध्ये सांगितले की, रविवारी 23 मे रोजी मुंबईत कोणत्याच लसीकरण केंद्रावर लसीकरण (Vaccination) केले जाणार नाही. सोमवारच्या लसीकरणाबतची माहिती महानगरपालिकेच्या ट्विटर हॅन्डलद्वारे आणि संबंधित वॉर्डाद्वारे नागरिकांना कळवण्यात येईल.

पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लोकांच्या शंकेला उत्तर देताना, लस उपलब्ध नसल्यामुळे लसीकरण बंद होत नसल्याची स्पष्ट माहिती नागरिकांना दिली आणि नागरी मंडळाचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी रविवार असल्याने लसीकरण केंद्रे बंद राहतील हे कारण स्पष्ट केले आहे.

मुंबईत कोरोनाचे 1,253 नवे रुग्ण

मुंबईत कोरोनाचे 1,283 नवे रुग्ण आढळून आलेत त्याचबरोबर कोरोनामुळे 52 लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या 6,92,483 वर पोहोचली आहे, आतापर्यंत 14,516 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (1,253 new patients of Corona in Mumbai)

पुण्यात शनिवारी 3,520 कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आल्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 9,92,436 वर पोहोचली आहे, त्याचबरोबर कोरोनामुळे 15,995 लोकांचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 26,133 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

गेल्या 24 तासात महाराष्ट्रात 26,133 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 682 लोकांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आता एकूण 55,53,225 लोकांना कोरोनाची लागण होऊन 87,300 लोकांचा मृत्यू होऊ शकतो, असा अंदाज आरोग्य विभागाने (health ministry) वर्तवला आहे. आतापर्यंत 40,294 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून कोरोनातून बरे होणाऱ्या लोकांची संख्या 51,11,095 वर पोहोचली आहे. (Maharashtra recorded 26,133 new corona patients in last 24 hours)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments