खूप काही

Corona vaccine upadate: 12-15 वयोगटाच्या लसीकरणाला परवानगी, ‘या’ देशाने घेतला पुढाकार

12 ते 15 वयोगटासाठी लहान बालकांना फायजर लस देण्याचं नियोजन अमेरिका करत आहे, त्यामुळे भारतातही त्याबाबत नियोजन होणार का, असा सवाल विचारला जात आहे.

भारतात सतत वाढत चाललेल्या कोरोना महामारीच्या (Corona Virus)
लढ्याला अमेरिकेकडून मोठी दिलासादायक बातमी मिळाली आहे. 12 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांच्या कोरोना लसीला फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन (Food and drug administration ) ने मान्यता दिली आहे. फायझर-बायोएनटेकने ही कोरोना लस (Pfizer-BioNTech COVID Vaccine) बनविली आहे. ही लस तरुणांना दिली जाणार आहे. गुरुवारपासून अमेरिकेत 12 ते 15 वयोगटासाठी लसीकरण सुरु होऊ शकते.

मार्चच्या शेवटच्या आठवड्यात फायझर-बायोएनटेक(Pfizer-BioNTech COVID Vaccine)ने ही कोरोना लस मुलांसाठी १०० टक्के यशस्वी ठरल्याचा दावा केला होता. लस घेतल्यानंतर कोणतेही ‘साइड इफेक्ट’ देखील होत नसल्याचं कंपनीनं म्हटले होते.कोरोनाच्या लसीला साधारण दीड महिन्यांनी अमेरिकेने परवानगी दिली आहे. या पावलाला एफडीए(FDA) चे कार्यवाहक आय़ुक्त जेनेट वुडकॉक यांनी कोरोना महामारीविरोधातील महत्वाचा टप्पा म्हटले आहे.

एफडीए(FDA)ने सर्व उपलब्ध आकड्यांचा सखोल अभ्यास करून . आधी 16 वर्षांहून अधिक वयाच्या मुलांच्या आपत्कालीन लसीकरणासाठी परवानगी दिली होती.
तर आता भारतात कॅडिला हेल्थकेअर (Cadila Healthcare Ltd) ही कंपनी 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांच्या लसीसाठी काम करत आहे.

अहमदाबादच्या कॅडिला हेल्थकेअर कंपनीने कोरोना लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणीही केली आहे. यामुळे या भारतात लसीकरणासाठी वापर केली जाणारी ही चौथी कोरोना लस असणार आहे. सध्या 18 वर्षांवरील नागरिकांसाठी सीरमची कोव्हिशिल्ड(serum covishield) , भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन (COVAXIN) आणि रशियाची स्पतनिक व्ही(Sputnik V vaccine)चा वापर सुरु झाला आहे. 12 ते 15 वर्षांच्या मुलांसाठी लस आल्यास तो एक मोठा लढा ठरणार आहे( Vaccine for 12-15 age group)

फायजर लसीच्या चाचणीत भारतीय वंशाच्या अभिनवने घेतला सहभाग-

आॅक्टोबर 2020 पासुन सुरु केलेल्या फायजर लसीच्या चाचणीचे परिणाम आता समोर येत आहेत.अमेरिकेतील सिनसिनाटी चिल्ड्रन्स हॉस्पीटल(Cincinnati Children’s Hospital )मध्ये भारतीय वंशाच्या १२ वर्षीय अभिनव यानेही फायजर लशीच्या चाचणीत सहभाग घेतला होता.अभिनव याचे वडील डॉक्टर असून तेही या लशीच्या चाचणीत सहभागी झाले होते.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments