आपलं शहर

corona vaccine update : मुंबईकरांना आता घरोघरी कोरोनाची लस मिळणार, जाणून घ्या पूर्ण माहिती….

भारतीय जनता पक्षाचे (BJP) अधिकारी मनोज कोटक (Manoj kotak) यांनी फोर्टीस हॉस्पिटल (fortis hospital) च्या सहाय्याने उत्तर मुंबईत घरोघरी लसीकरण मोहीम सुरू केली आहे

Corona vaccine update :देशात कोरोनाच्या साथीचा झपाट्याने प्रसार होत असताना कोरोनावर मात करण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी कोरोनाची लस घेणे हाच एक मार्ग आहे. त्यामुळे देशभरात लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली पण मुंबईत मात्र कोरोनाची लसीकरण मोहीम सुरू झाल्यानंतर लस घेण्यासाठी लोकांना लांब लांब रांगांमध्ये तासनतास उभे राहावे लागत होते. यावर उपाय म्हणून महानगरपालिकेने अनुमती दिल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे (BJP) अधिकारी मनोज कोटक (Manoj kotak) यांनी फोर्टीस हॉस्पिटल (fortis hospital) च्या सहाय्याने उत्तर मुंबईत घरोघरी लसीकरण मोहीम सुरू केली आहे. (corona vaccine update: Mumbaikars will now get corona vaccine at home)

घरोघरी लसीकरण (door to door vaccination) या मोहिमेअंतर्गत मुलुंड येथील गोल्डन विला या रहिवासी सोसायटीत घरोघरी लसीकरण मोहीम राबवण्याची सुरुवात केली गेली .या सोसायटीमधील लोकांना कित्येक महिन्यांपासून कोरोनाची लस मिळवण्यासाठी तासनतास रांगेत उभे रहावे लागत होते.तरीदेखील त्यांना लसीसाठी बुकिंग करता येत नव्हते,परंतु महानगरपालिकेच्या घरोघरी लसीकरण या मोहिमेअंतर्गत आपल्या दारातच कोरोनाची लस मिळेल यावर त्यांचा विश्वासच बसला नाही.

शनिवारी मुंबईत 314 नियुक्त कोव्हिड लसीकरण केंद्रांमध्ये (CVC) एकूण 25,510 लोकांना लस देण्यात आली असून त्यापैकी 3,966 लाभार्थी 60 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील होते. याशिवाय शनिवारी लस घेणारे 14,054 लाभार्थी हे 45 ते 59 years वयोगटातील होते व आणि 7 ते years 44 वयोगटातील फक्त 158 लोक होते. शनिवारी एकूण 297 आरोग्यसेवा कर्मचारी (HCW) आणि 35 फ्रंटलाइन कामगार (FLW) यांना लस देण्यात आली.

मुंबईत आजपर्यंत एकूण 29,55,267 लोकांनी कोरोनाची लस घेतली असून त्यापैकी 2,99,835 एचसीडब्ल्यू (HSW) आहेत, 3,57,595 एफएलडब्ल्यू (FLW) आहेत, 11,72,755 लोक 60 वर्षा वरील वयोगटातील आहेत आणि 10,45,005 लोक 45 ते 59 वयोगटातील आहेत. 80,077 लोक 18 ते 44 वयोगटातील आहेत.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments