खूप काही

Corona virus update: मुंबईप्रमाणे दिल्लीतदेखील कोव्हिड वॉर रूमची स्थापना

मुंबईतील कोव्हिड वॉर रूमच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतदेखील कोव्हिड वॉर रूम स्थापन करण्याची मागणी केली जात आहे

Corona virus update:दिल्ली-मुंबईसारख्या मोठ्या शहरांना कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा (corona third wave) धोका असल्याचे संकेत आरोग्य विभागाने दिले आहेत. कोरोनाचा तिसऱ्या लाटेमुळे प्रामुख्याने लहान मुले संक्रमित होऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे मुंबईतील कोव्हिड वॉर रूमच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतदेखील कोव्हिड वॉर रूम स्थापन करण्याची मागणी केली जात आहे. (corona virus update:covid warroom will be set up in delhi as in mumbai)

दिल्लीतील 2500 रेसिडेंट वेल्फेअर असोसिएशनचे (Resident welfare association) प्रतिनिधित्व करणाऱ्या युनायटेड रेसिडेंट जॉईंट ॲक्शन ऑफ दिल्ली (United resident joint action of Delhi) या संस्थेने तिसऱ्या लाटेला सामोरे जाण्यासाठी मुंबईप्रमाणे दिल्लीतदेखील कोव्हिड वाॅर रूमची (covid war room) सुविधा उपलब्ध व्हावी अशी मागणी दिल्ली सरकारकडे केली आहे.

दिल्लीत वॉर्ड स्तरावर कोव्हिड वॉर रूम तयार केल्यास कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सामोरे मदत होईल,तसेच कोरोनाची टेस्ट, उपचार आणि लसीकरणाचे कार्य सहजपणे केले जाऊ शकते असे संस्थेचे अध्यक्ष अतुल गोयल (Atul Goyal) यांनी सांगितले.

रविवारी महाराष्ट्रामध्ये 18,600 नवीन कोरोनाच्या रुग्णांची नोंदली झाली असून, मार्च महिन्यापासूनची ही सर्वात कमी एक दिवसीय मोजणी आहे. राज्यात 2,71,801 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (active patients) आहेत तर गेल्या 24 तासांत मुंबईत 1,066 नवीन कोरोनाच्या रुग्णांची नोंद झाली आहे. (Maharashtra corona cases)

मुंबईत कोरोनाच्या मृत्यूदरातदेखील घट झाली आहे. गेल्या 24 तासात कोरोनामुळे 22 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, राज्यात लॉकडाऊन आणखी 15 दिवसांसाठी वाढवल्याने, नागरिकांनी सरकारला सहकार्य करावे असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (chief minister Uddhav Thackeray) यांनी केले. (Lockdown exceeds by 15 days)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments