खूप काही

Corona virus update :दिल्ली-मुंबईने करून दाखवलं, दक्षिण भारताला कोरोनाने हरवलं, वाचा धक्कादायक माहिती…

दिल्ली-मुंबईत कोरोनाच्या रुग्णांमध्ये घट झाली तर आता दक्षिण भारतात कोरोनाचा वाढला प्रभाव

Corona virus update :कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा(covid second wave) सर्वाधिक प्रभाव हा मुंबई आणि दिल्ली या शहरांवर दिसून आला होता. परंतु आता दिल्ली आणि मुंबईतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची (Delhi mumbai corona cases) संख्या झपाट्याने कमी होत आहे. भारतातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची आकडेवारी लक्षात घेता एकूण संख्येपैकी 47% कोरोना रुग्ण हे दक्षिण भारतातील आहेत त्यामुळे कोरोनाच्या साथीने दक्षिण भारताला वेढण्यास सुरुवात केली आहे असे म्हणण्यास हरकत नाही.(Corona patients declined in Delhi-Mumbai)

21 मे 2021 रोजी समोर आलेल्या रुग्णांच्या आकडेवारीनुसार भारतात एकुण 2,59,251 नवीन कोरोना रुग्णांची नोंदली झाली होती त्यांपैकी 1,22,476 रुग्ण हे दक्षिण भारतातील कर्नाटक (Karnataka), तमिळनाडू (tamilnadu), केरळ (Kerala),आंध्र प्रदेश (aandhrapradesh) आणि तेलंगणा (telangana) या पाच राज्यांतील होते.(Consistent increase in the number of corona patients in South India)

21 मे च्या आकडेवारीत सर्वाधिक 36,184रुग्ण हे तमिळनाडू राज्यातील असून दुसऱ्या क्रमांकावर कर्नाटक तर तिसऱ्या क्रमांकावर केरळ राज्य होते.आश्‍चर्याची बाब म्हणजे नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या असूनही तमिळनाडू आणि केरळसारख्या राज्यांमध्ये कोरोनाचा प्रभाव वाढताना दिसून येत आहे.

दिल्ली-मुंबईत कमी झाले कोरोनाचे रूग्ण.

21 मे रोजी केलेल्या कोरोना रुग्णांच्या आकडेवारीनुसार एकूण रुग्ण संख्येपैकी मुंबईत 1,416 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून दिल्लीत 3,009 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.दोन्ही शहरांची आकडेवारी लक्षात घेता दिल्ली-मुंबईत कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याचे दिसून आले.त्याचवेळी दक्षिण भारतातील शहरांमध्ये कर्नाटकची राजधानी असलेल्या बेंगळूरू शहरात सर्वाधिक 9,591 कोरोना रुग्ण आढळून आले असून चेन्नईमध्ये 5,913 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. (Corona patients reduced in Delhi and Mumbai)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments