खूप काही

Corona virus update : वारंवार RT-PCR चाचणी करू नका, ICMR ने सांगितले मुख्य कारण…

कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची वारंवार RTPCR चाचणी घेण्याची आवश्यकता नाही, असे मत ICMRने स्पष्ट केले आहे.

देशात पुन्हा कोरोनाची साथ वाढत आहे. त्यामुळे , भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदे(ICMR)ने कोरोनाच्या या दुसर्‍या लहरी दरम्यान कोरोना चाचणी सुरू ठेवण्याचा सल्ला दिला आहे. आयसीएमआरने म्हटले आहे की जे लोक एकदा आरटीपीसीआर(RTPCR) किंवा रॅट (RAT) टेस्ट पॉझिटिव्ह आले आहेत त्यांची पुन्हा चाचणी करू नये.

 

आयसीएमआरने नमूद केले आहे की राज्यात प्रवास करणाऱ्या निरोगी व्यक्तींसाठी आरटीपीसीआर(RTPCR) ची चाचणी घेण्याची गरज नाही.असे केल्याने अनेक कोरोना चाचणी लॅबवरचा भार कमी केले जाऊ शकतो. तसेच प्रवाश्यांनी कोरोनाशी संबंधित सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण केले पाहिजे. ज्यामुळे कोरोनाचा संसर्ग कमी होईल.तसेच खासगी आणि सरकारी रुग्णालयांना आरटी-पीसीआर चाचणीचा पूर्ण वापर करण्यास सांगितले गेले.

आयसीएमआरने चाचणी संदर्भात सूचना दिल्या आहेत

1.जे लोक एकदा पॉझिटिव्ह आले आहेत त्यांची पुन्हा आरटी-पीसीआर(RTPCR) चाचणी घेऊ नये.

2.कोरोनामधून बरे झाल्यानंतर आरटी-पीसीआर(RTPCR) चाचणी घेण्याची आवश्यकता नाही.

3.आंतरराज्य प्रवास करणार्‍या निरोगी व्यक्तींना आरटीपीसीआर (RTPCR) चाचणी घेणे आवश्यक नाही.

आयसीएमआरने म्हटले आहे की देशात कोरोनाची प्रकरणे पुन्हा एकदा वेगाने वाढत आहेत. सध्या देशात कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांचा दर 20 टक्के आहे. यामुळे कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आल्यास चाचणी करणे, , योग्य अंतर ठेवणे, मास्क घालणे हाच कोरोनाची संघर्ष करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments