आपलं शहर

Corona virus update: मुंबईकरांसाठी खुशखबर, लवकरच कोरोनामुक्त होईल मुंबई…

मुंबईकरांसाठी मोठी खुशखबर, मुंबई हळूहळू कमी होतोय कोरोना..

देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. मात्र देशाची आर्थिक राजधानी मुंबई कोरोनाच्या संकटातून हळूहळू बाहेर पडत आहे. केंद्र सरकारनेदेखील कोरोना काळात मुंबईतील कामाबद्दल BMC चे कौतूक केले आहे. परंतु मुंबईचा कोरोनामुक्तीचा प्रवास काही सोपा नव्हता.

एका निर्णयाने वाचला अनेकांचा जीव

17 एप्रिलपासून मुंबईत कोरोनाचे रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत असताना सहा हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला होता. अशा परिस्थितीत पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी लागलीच 168 रुग्णांना तात्पुरते दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्त केले होते. त्या सगळ्या रुग्णांच्या ऑक्सिजनची योग्य सोय करण्यात आली होती. त्यांच्या या एका निर्णयाने अनेक जणांचा जीव वाचला होता.

सगळ्यात भयानक रात्र

इकबाल चहल यांनी सांगितले की, ऑक्सीजनचा तुटवडा निर्माण झाला त्या रात्री अत्यंत भयावय परिस्थिती निर्माण झाली होती. तर दुसऱ्या बाजूला ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे अनेकांचा जीव धोक्यात आला होता. मार्च महिन्यापासूनची आकडेवारी लक्षात घेता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मुंबईत 2784 लोकांचा मृत्यू झाला.

मुंबईसारखेच नियम लागू होणार इतर राज्यात

सर्वोच्च न्यायालयाने मुंबईत लागू केलेल्या नियमांचे आणि मार्गदर्शक सुचनांचे अनुकरण देशाच्या इतर राज्यांमध्ये करण्याचे आदेश दिले आहेत. बीएमसीच्या टीमने एकजुटीने काम केल्यामुळे आणि सर्व वैद्यकीय तसेच आपात्कालीन सुविधांवर लक्ष ठेवण्यामुळे मुंबईतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण 31 टक्क्यांवरून आता 3 टक्क्यांवर येऊन पोहोचले आहे. हीच टक्केवारी मे महिन्यापर्यंत 2 टक्‍क्‍यांवर येईल असे बृहन्मुंबई महानगरपालिकेने सांगितले. कोरोनाच्या या दीर्घकालीन संघर्षाला एकट्याने नव्हे तर एकजुटीने जिंकले जाऊ शकते, असंही सांगायला चहल विसरले नाहीत.

मुंबईत लसीकरण 60 दिवसात पूर्ण

मुंबईतील अनेक लसीकरण केंद्रावर लसींचा साठा संपत असल्याने अनेकांना नाराज व्हावं लागत आहे, अनेकजणांचे रजिस्ट्रेशन होऊनदेखील लस न मिळाल्याची उदाहरणे आहेत, त्यामुळे सर्व मुंबईकरांना लस मिळावी, यासाठी पालिकेने हा मोठा निर्णय घेतला आहे, येत्या 60 दिवसांत मुंबईतील सर्व नागरिकांना कोरोनाची लस जलद गतीने दिली जाईल, त्यामुळे मुंबईत तिसऱ्या लाटेची शक्यता भासणार नाही, सोबत लसीकरणामुळे मुंबईतील वाढत्या कोरोना रुग्णांचा ग्राफ निश्चितच कमी होईल, अशी माहितीदेखील चहल यांनी दिली. (vaccination in Mumbai completed in 60 days)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments