आपलं शहर

Mumbai Corona Update : मुंबईकरांसाठी गूड न्यूज, 13 एप्रिलनंतर पहिलीवेळ अशी घटना…

13 एप्रिलनंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत घट..

मुंबईत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे 13 एप्रिलनंतर कोरोना संक्रमणाने झालेल्या मृतांची संख्या हळूहळू कमी होताना पाहायला मिळाली. मागील 24 तासात कोरोना संक्रमणामुळे 34 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

13 एप्रिलनंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत घट
बृहन्मुंबई महानगरपालिकेनुसार बुधवारी मुंबईमध्ये 1 हजार 362 नवीन रुग्ण दाखल करण्यात आले आहेत. एकूण कोरोना रुग्णांची संख्या 7 लाख 1 हजार 266 झाली आहे. त्याचबरोबर 34 जणांचा मृत्यू झाल्यामुळे एकूण मृतांची संख्या 14 हजार 742 वर येऊन पोहोचली आहे.(Decrease in the number of corona patients after 13 April)

मंगळवारी कोरोना रुग्णांच्या संख्येत 1 हजार 057 नवीन रुग्णांची भर पडली आणि 48 रुग्णांचा मृत्यू झाला होता. 13 एप्रिलनंतर कोरोनाचे 1 लाख नवीन रुग्ण समोर आले आहेत. तर 14 एप्रिलला सापडलेल्या रुग्णांची संख्या 11 हजार 163 इतकी होती.

मुंबईमध्ये 94 % रुग्ण झाले ठीक
महानगरपालिकेने सांगितले की, मुंबईमध्ये 27 हजार 943 रुग्णांवर उपचार सुरू आहे. तर मागील 24 तासात 1हजार 21 रुग्ण ठीक होऊन घरी गेले आहेत. 1 मेला 90 रुग्णांचा मृत्यू झाला. आत्तापर्यंत मुंबईमध्ये 6 लाख 56 हजार 440 लोक कोरोनवर मात देऊन बरे झाले आहेत. कोरोना रुग्णांचा ठीक होण्याचा आकडा आता 94% वर येऊन पोहोचला आहे.(In Mumbai, 94% of the patients were cured)

हळूहळू लॉकडाऊन कमी करण्यात येणार
कोरोनाची संख्या वाढत असल्याने राज्यभरात लॉकडाऊन केले गेले होते. परंतु आता रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी थोड्या प्रमाणात सूट देण्याबद्दल सांगितले आहे. हळूहळू अनलॉक करण्याची योजना बनवली जात आहे परंतु अजूनही अनलॉक कधी पासून सुरू होणार हे सांगितले गेलेले नाही. कारण राज्यात तिसरी लाट कधीही येऊ शकते.(Gradually the lockdown will be reduced)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments