खूप काही

गावात वाढला कोरोना म्हणून पुन्हा धरली मुंबईची वाट, गर्दीला सुरुवात…

मुंबईतील कोरोनाचे प्रमाण वाढल्याने स्थलांतरित झालेले लोक पुन्हा मुंबईत परतू लागले आहेत.

मुंबईतील कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा योग्यप्रकारे सामना करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने प्रशासनाचे कौतुक केले. पण, हे देखील खरे आहे की या काळात कोट्यवधी लोक स्थलांतरित झाले, ज्यामुळे मुंबईतील हॉस्पिटलवरचा दबाव कमी झाला.

उत्तर प्रदेशातील पंचायत निवडणुका, पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुका आणि राजस्थानमधील विवाहसोहळे यामुळे दररोज सुमारे एक लाख लोक मुंबईहून स्थलांतर करतात. आधी या भागांमध्ये कोरोनाची परिस्थिती फारशी वाईट नव्हती. पण आता परिस्थिती बदलली आहे.

आता मुंबईतील कोरोना नियंत्रणात असल्यासारखे दिसत आहे, पण मुंबई बाहेर कोरोना बेकाबू झाला आहे. याच कारणांमुळे लोक बाहेरील राज्यांमधून मुंबईला परतू लागले आहेत. त्यामुळे मुंबईत कोरोनाच्या रूग्णसंख्येत वाढ होऊ शकते.

उत्तर प्रदेशातून परतले मुंबईकर.

उत्तर प्रदेशात कोरोनाचे प्रमाण खूप वेगाने वाढत आहे. पंचायत निवडणुकांनंतर लाखो लोक आता उत्तर प्रदेशातून मुंबईकडे परतू लागले आहेत. 15 एप्रिलपर्यंत उत्तर प्रदेशकडून मुंबईकडे येणार्‍या गाड्यांची प्रवासी क्षमता सुमारे 50% होती. आता उत्तर प्रदेशहून येणाऱ्या गाड्यांची सरासरी क्षमता 70%च्या आसपास आहे तर एका रेल्वेमधुन 1400 ते 1500 प्रवासी मुंबईत परत येत आहेत.

गोरखपूर ते मुंबई 80%

मुंबईहून गोरखपूरपर्यंत सर्वाधिक गाड्या धावल्या गेल्या आहेत . गोरखपूरहून दररोज सरासरी 3 गाड्या मुंबईकडे येत आहेत आणि 25 एप्रिलपासून या गाड्यांमध्ये प्रवाशांची संख्या सातत्याने वाढत आहे.

कारवाईचा कोणताही पुरावा उपलब्ध नाही –

राजस्थान, केरळ, गोवा, दिल्ली आणि एनसीआर, गुजरात, उत्तराखंड, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश हे महाराष्ट्र सरकारने संवेदनशील राज्य म्हणून घोषित केले आहेत . संवेदनशील राज्यांमधून मुंबईत येणाऱ्या लोकांसाठी 48 तासांच्या आरटी पीसीआर(RT-PCR)चे निगेटिव्ह रिपोर्ट आणणे बंधनकारक करण्यात आले आहे.

राज्य सरकारने जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार संवेदनशील राज्यांकडून मुंबईकडे परत जाणारी प्रत्येक ट्रेल्वे प्रवाशाची माहिती स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला चार तास अगोदर द्यावी लागते, याबाबत मुंबई महापालिकेच्या हद्दीतही काही तपास सुरू आहे, परंतु मनपाच्या इतर भागात याकडे केले जात आहे.पण याचा कोणताही पुरावा उपलब्ध नाही आहे .

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments