कारण

Shivbhojan Thali : ठाकरे सरकारचा खुलासा, गरिबांना दिलासा; शिवभोजन थाळीचा सर्वात मोठा निर्णय

गरजू आणि गरीब समाज घटकांना शिवभोजन थाळी मोफत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

Shivbhojan Thali 14 जूनपर्यंत राज्यात ब्रेक द चैन (break the chain) या अभियानांतर्गत गरजू आणि गरीब समाज घटकांना शिवभोजन थाळी मोफत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शिवभोजन थाळीच्या माध्यमातून रस्त्यावर राहणाऱ्या अनेक गरिबांना त्यानिमित्ताने जेवन मिळत असते. शिवसेनेने घोषणा केलेल्या या उपक्रमाचा अनेक गरजुंना चांगला फायदा होत आहे, अशाच उपक्रमामध्ये अजून एक भर पडली आहे.

15 एप्रिलपासून पुढे एक महिना शिवभोजन थाळी मोफत देण्याची (free of cost food) योजना राबवण्यात आली होती, मात्र या मुदतीत अजून एका महिन्याची भर पडली आहे. आणखी एक महिन्यासाठी म्हणजेच 15 जूनपर्यंत ही मुदत वाढवण्यात आली आहे.

भुजबळ यांचा प्रस्ताव मान्य

14 मे रोजी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Cabinet Minister of Food and Civil Supply) यांच्या प्रस्तावास मान्यता देऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM uddhav Thackeray) यांनी यासंबंधीचा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या काळात ब्रेक द चैन अंतर्गत राज्यात कडक नियम लागू करण्यात आले आहे, त्यामुळे अनेक हॉटेल्स, धाबे, इतर जेवणाची ठिकाणे बंद असल्याने शिवभोजन थाळी योजनेचा अनेकांना फायदा होत आहे.

शिवभोजन थाळीचा आराखडा

15 एप्रिल 2021 ते 20 मे 2021 पर्यंत 48 लाख 44 हजार 709 लोकांनी शिवभोजन थाळीचा मोफत लाभ घेतला असल्याची माहिती राज्य सरकारने दिली आहे. कोरोना काळात गरीब आणि गरजू जनतेला मोठा आधार शिवभोजन थाळीच्या रुपात मिळत असल्याचे मत छगन भुजबळ यांनी वर्तवलेलं आहे. राज्यात सुरु केलेल्या या योजनेत जवळपास 4 कोटी 27 लाख 81 हजार 306 थाळ्यांचे वितरण झाले असून राज्यात 950 केंद्र सुरू करण्यात आले आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments