Fake Crime Branch officer : पैसे ठगण्याचा नवा धंदा, चक्क पोलिसांनाच केलं बुमरँग…
मुंबईच्या दहिसर पोलिसांनी एका खोट्या क्राईम ब्रांच अधिकाऱ्याला अटक केली आहे.

Fake Crime Branch officer : मुंबईच्या दहिसर पोलिसांनी एका खोट्या क्राईम ब्रांच अधिकाऱ्याला अटक केली आहे. तो अधिकारी लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्यांकडून दंड वसूल करत असे आणि नागरिकांकडून पैसे उकळून लोकांची फसवणूक करत होता. (Fraud of citizens by Fake Crime Branch officials)
भर दुपारी करायचा साफ
संदीप चंद्रकांत खोत (वय 32) असं या गुन्हेगाराचं नाव आहे. सामान्य नागरिकांसह पोलिसांचीही गेले कित्येक दिवस फसवणूक करत असे. दुपारी 2 नंतर रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांवर आरोपी कारवाई करत होता. विनाकारण, विनामास्क फिरणाऱ्या लोकांवर तो नजर ठेवून असे, आजूबाजूला इतर कोणी पोलिस नसलेलं पाहून हा त्या नागरिकांवर कारवाई करत असे. दुपारी दोननंतर अनेक ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त कमी असतो, अनेक पोलीस जेवन करत असतात तर काही ठिकाणी पोलिसांची शिफ्ट बदलण्याची वेळ असते, याचाच फायदा घेऊन हा गुन्हेगार अनेक लोकांना फसवत असते. (Fraud of police including citizens by fake officer)
काय घडला प्रसंग
दहिसर पूर्वच्या आनंद नगरमध्ये एक पान टपरीचे दुकान आहे. हे दुकान आणि घरातील दरवाजा एकच असल्याने अनेकदा घराबाहेर पडताना दरवाजा उघडल्याने दुकानही सुरु होत असे, असाच एक प्रसंग आरोपीच्या समोर घडल्याने तात्काळ आरोपीने दुकानदारावर कारवाई करण्यास सुरुवात केली. लॉकडाऊनचे नियम तोडल्याच्या कारणावरून क्राईम ब्रँचच्या बोगस अधिकाऱ्याने संबंधित दुकानदाराला 70 हजाराच्या दुकानातील सामानासहित एका खासगी गाडीमध्ये बसवलं. एका निर्जन स्थळी गेल्यानंतर आपल्याकडे असलेला चाकू दाखवत आरोपी दुकानदाराला धमकावू लागला. इतकच नाही तर दुकानातील सर्व साहित्यासह खिश्यामध्ये असलेले 7000 हजार रुपयेही आरोपीने दुकानदाराकडून काढून घेतले. (How the fraud happened)
दुकानदारानेच केला गुन्ह्याचा तपास
आपल्याबरोबर झालेल्या अन्यायाविरुद्ध त्याने जवळच्या पोलीस ठाण्यात या क्राईम ब्रांच अधिकाऱ्याची चौकशी केली. चौकशी केल्यानंतर असा कोणताच अधिकारी रजिस्टरवर नसल्याचं संबंधित दुकानदाराला समजलं. त्यानंतर त्याने आपल्यासोबत घडलेला सर्व प्रसंघ दहिसर पोलीस स्टेशनला कळवला. तक्रार नोंदवताच संदीप खोतसह त्याच्या अनेक साथिदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे, आरोपींकडून ओळखपत्र, पोलिसांची काठी, महाराष्ट्र पोलिसांच्या नावे असलेले मास्कही जप्त करण्यात आले आहेत. (The shopkeeper himself investigated the crime)
पोलिसांच्या खोट्या ओळखपत्राचा आणि मास्कचा वापर करणाऱ्या अनेक टोळ्या आता सजक झाल्या आहेत, महाराष्ट्रासह मुंबई पोलिसांकडून केली गेलेली कारवाई ही एका मर्यादेत असते, मात्र अशा कारवाया जर तुमच्यासोबत घडत असतील, तर तुम्हाला लवकर सावध व्हावं लागेल आणि आपल्यासोबत फसवणूक होत असल्याची तक्रार पोलिसांत दाखल करावी लागेल.
Can’t be swifter than us!
Antop Hill Police conducted a thorough investigation of an incident – a lady had lost her gold chain to 2 men on a motorbike.
The 2 accused were arrested within 36 hours.#MumbaiCaseFiles pic.twitter.com/fx8E0EqL1x— Mumbai Police (@MumbaiPolice) May 20, 2021