खूप काही

Petrol diesel rate: पेट्रोलने केली सेंचुरी पार, वाचा ताजे अपडेट

मे महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत 13 वेळा वाढ

आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. मुंबईमध्ये एक लिटर पेट्रोलचा दर 99 रुपये आहे तर दिल्लीमध्ये अजूनही पेट्रोलचा दर 93 रुपयेच आहे. 4 मेपासून सलग 4 दिवस पेट्रोल डिझेलचे दर वाढत होते.

मे महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत 13 वेळा वाढ झाली आहे. परंतु दिल्लीमध्ये या महिन्यात पेट्रोलच्या दरात 3 रुपयांनी वाढ झाली आहे तर डिझेल 3.59 रुपयांनी वाढले आहे. सरकारी तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जारी केली आहेत.(Fuel prices at new record highs; Petrol near Rs 100/litre in Mumbai)

इतर शहरातील पेट्रोल डिझेलचे दर
दिल्लीतील पेट्रोलचा दर 93 रुपये आहे तर मुंबईमध्ये दर 99 रुपये आहे. चेन्नईमध्ये 95 रुपये आणि कोलकत्ता मध्ये 93 रुपये इतका आहे. काही दिवसातमुंबईतील पेट्रोलचा दर शतक पार करेल. राजस्थानमधील अनेक जिल्ह्यात पेट्रोलचा दर 100 रुपये प्रतिलिटर झाला आहे.(Rates of petrol and diesel in the city)

निवडणुकीदरम्यान पेट्रोलचे दर होते स्थिर
गेल्या 2 महिन्यांपासून अनेक राज्यांमध्ये निवडणुका सुरू होत्या.या दरम्यान पेट्रोल डिझेलचे भाव स्थिर असल्याचे पाहायला मिळाले. मात्र निवडणुकीनंतर इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होत आहे.(Petrol prices were stable during the election)

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील पेट्रोल दर
परभणी जिल्ह्यात पेट्रोलचा दर प्रतिलिटर 102 रुपये तर डिझेलचा दर 92 रुपये, सिंधुदुर्ग आणि नांदेडमध्ये पेट्रोलचा दर 101 रुपये तर डिझेलचा दर 91 रुपये आणि नाशिक,वर्धा जिल्ह्यात पेट्रोलचा दर 100 रुपये तर डिझेलचा दर 90 रुपये आहे.(Today, petrol prices in many districts of Maharashtra)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments