खूप काही

Gold Rate Today Live : सोने दराची 50 हजारांकडे वाटचाल, ऑगस्टमध्ये दरांची विक्रम मोडण्याची शक्यता

इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते 10 ग्रॅम सोन्याचा दर 48,015 रुपयांवर पोचला आहे. मे महिन्यात आतापर्यंत सोन्याच्या किंमतीत 1,224 रुपयांची वाढ झाली आहे.

Gold Rate Today Live : कोरोना कालावधीत दुसर्‍या लाटे दरम्यान, सोने आणि चांदीची दर झपाट्याने वाढत आहेत. सोन्याचे दर 10 ग्रॅम 48 हजार रुपयांच्या पलीकडे गेले आहेत, तसेच त्याआधी सोन्याची किंमत 49 हजारपर्यंत पोहोचली होती. असा अंदाज आहे की लवकरच सोने 50 हजारांवर येण्याची शक्यता आहे. (Gold is slowly moving towards 50 thousand, may break its record again in August)

सोने किंमत एप्रिल महिन्याच्या शेवटी 10 ग्रॅम 46,791 रुपये होती, तर आता 48,593 रुपये झाली आहे. चांदीची किंमत एप्रिल महिन्याच्या शेवटी 67,800 रुपये प्रतिकिलो होती, आतापर्यंत 71,575 रुपयांवर पोहोचली आहे. एप्रिल महिन्यातही सोन्याचांदीच्या किंमती वाढल्याचं दिसून आलं आहे.

ऑगस्ट महिन्यात नवीन विक्रम

(IIFL) सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष वस्तू आणि चलन (Commodity and Currency) अनुज गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार कोरोना काळात दुसऱ्या लहरीमध्ये सोन्याचा वेग वाढला असून आता अशी शक्यता आहे की सोने पुन्हा 50 हजारंच्या पुढे जाईल. ऑगस्टपर्यंत सोने पुन्हा 55,000 सोन्याच्या पातळीवर जाऊ शकते, जर सोन्याचा वाढता वेग असाच राहिला तर या वर्षी ऑगस्ट महिन्यात नवीन विक्रम होण्याची शक्यता आहे.

प्रॅक्टोकरन्सीमुळे सोने किंमतीची वाढ

सोने किंमतीची वाढजागतिक स्तरावर क्रिप्टोकरन्सीवर चीनने पूर्णपणे बंदी घातली आहे, अशात कंपन्यांनी व्यवहारासंबंधित सेवादेखील बंद केल्या आहे. या काळात क्रिप्टोकरन्सी खूप वेगाने वाढत असून गुंतवणूकदारांनी त्यांच्या बंदीमधून पैसे काढून सोन्याकडे वळवले असल्यामुळे सोन्याचा वेग वाढत आहे. या आगामी काळात गुंतवणूकदार शेअर बाजारच्या बाहेर पडून सोन्यात गुंतवणूक करतील, अशीही शक्यता अभ्यासकांनी वर्तवली आहे.

कोरोनामुळे गेल्यावर्षीनुसार यावर्षीही सोन्याच्या किंमतीत पुन्हा नवीन विक्रम निर्माण होईल. सोन्याला कोरोनाकडून आणि क्रिप्टोकरन्सीवरील बंदीमुळे फायदा होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने प्रतिअंश अमेरिकन डॉलर्सपर्यंत पोहोचले आहेत, येणाऱ्या काळात ते 1900 च्या पुढे जाण्याची शक्यता आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments