खूप काही

Gold rate today : सोन्याच्या दरात तब्बल 9 दिवसांनी इतक्या रुपयात वाढ…

सोन्याचा चमक कायम,तर 10 ग्रॅम सोन्याला मोजावी लागणार एवढी रक्कम.

आंतरराष्ट्रीय बाजारात तेजीच्या पार्श्वभूमीवर आज एमसीएक्सवरील डिलिव्हरीमध्ये सोन्याचा भाव दिसून येत आहे. जून डिलीव्हरीसाठी सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम 47887 रुपयांवर असणार आहे , तर सकाळी 13.2 रुपयांनी वाढून 10.25 वर होता. त्याचप्रमाणे ऑगस्ट डिलिव्हरी सोन्याचे दर प्रति दहा ग्रॅम 137 रुपयांनी वाढून 48270 रुपयांवर होणार. सध्या मेच्या पहिल्या 9 दिवसांत सोन्याने 1023 रुपयांची वाढ नोंदविली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव 2.85 डॉलरच्या वाढीसह 1,834.15 च्या पातळीवर होता. तर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासूनची ही सोन्याची सर्वोच्च गाठलेली पातळी आहे. चांदीमध्येही तेजी दिसून येत आहे. यावेळी चांदी 0.348 डॉलरच्या वाढीसह 27.825 डॉलरच्या पातळीवर व्यापार करीत आहे. चांदीही सध्या फेब्रुवारीच्या तिसर्‍या आठवड्यापासून उच्च स्तरावर व्यापार करीत आहे. दहा वर्षांच्या यूएस बाँडचे उत्पन्न आज 1.59 टक्के आहे जो फेब्रुवारीच्या दुसर्‍या आठवड्यापासून सर्वात उंचाकी पातळीवर आहे. डॉलर निर्देशांक 90.245 वर आहे . डॉलरची घसरण आणि उत्पन्न यामुळे सोन्याच्या किंमतीत वाढ होते.

शेअर बाजारातही उसळी घेतली : 

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारातही तेजी दिसून येत आहे. रिझव्‍‌र्ह बँकेच्या घोषणेनंतर आज सलग चौथे व्यापार सत्रानंतरदेखील बाजार तेजीत आहे. यावेळी सेन्सेक्स 355 अंकांच्या वाढीसह 49561 च्या पातळीवर व्यापार करीत होता. निफ्टी 109 अंकांच्या वाढीसह 14932 च्या पातळीवर व्यापार करीत आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments