खूप काही

15 जूनपासून सोन्यावर हॉलमार्क असणे अनिवार्य; आजचे सोन्या-चांदीचे दर

15 जूनपासून सर्व सोन्यावर हॉलमार्क असणे बंधनकारक केले आहे. हॉलमार्क नसल्यास ज्वेलर्स सोने विकू शकणार नाहीत.

1 जून 2021 पासून देशात सोन्यावर हॉलमार्किंग अनिवार्य करण्याचे निर्देश दिले होते. परंतु देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे आता ही तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. 15 जूनपासून सर्व सोन्यावर हॉलमार्क असणे बंधनकारक केले आहे. हॉलमार्क नसल्यास ज्वेलर्स सोने विकू शकणार नाहीत.

हॉलमार्किंग पुढे ढकलण्यात का आली?
हॉलमार्किंग जानेवारी महिन्यात लागू करण्यात येणार होते. कोरोनामुळे ही तारीख देखील पुढे बदलून 1 जून करण्यात आली. परंतु पुन्हा एकदा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे ही तारीख 15 जून करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.(Why was the hallmarking postponed?)

आज मुंबईमधील सोन्याचा दर
आज मुंबई मधील 22 कॅरेट सोन्याचा दर 46 हजार 800 रुपये आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर 47 हजार 800 रुपये आहे. आज सोन्याच्या दरात वाढ झाली आहे.10 ग्राम सोन्यामध्ये 800 रुपयांची वाढ झाली असून 100 ग्रॅम सोन्यामध्ये 8 हजार रुपयांची वाढ झाली आहे.(gold silver rate today in mumbai)

22 कॅरेट सोन्याचा दर
1 ग्राम 4 हजार 680 रुपये
8 ग्राम 37 हजार 440 रुपये
10 ग्राम 46 हजार 800 रुपये
100 ग्राम 4 लाख 68 हजार रुपये

24 कॅरेट सोन्याचा दर
1 ग्राम 4 हजार 780 रुपये
8 ग्राम 38 हजार 240 रुपये
10 ग्राम 47 हजार 800 रुपये
100 ग्राम 4 लाख 78 हजार रुपये

मुंबईमधील चांदीचा दर
आज चांदीच्या दरात देखील वाढ झाली आहे. मुंबईमधील चांदीचा दर प्रतिकिलो 72 हजार 700 रुपये आहे.

1 ग्राम 72.70 रुपये
8 ग्राम 581 रुपये
10 ग्राम 727 रुपये
100 ग्राम 7 हजार 270 रुपये
1 किलो 72 हजार 700 रुपये(silver rate today in mumbai)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments