खूप काही

अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर सोन्याच्या दरात होणार वाढ की घट..

सोन्याच्या दरात वाढ तर चांदीच्या दरात घट..

भारतीय संस्कृतीमध्ये अक्षय तृतीयेला खास महत्त्व आहे. या दिवशी सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. खास करून या दिवशी सोन्याची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. मागील वर्षी अक्षय तृतीया 26 एप्रिलला होती.

देशभरात कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने सोन्याची विक्री होऊ शकली नाही. यावर्षी अक्षय तृतीया 14 मे ला आहे. परंतु यावर्षीदेखील कोरोनाचे संकट असल्याने लॉकडाऊनमुळे सोन्याची जास्त विक्री होणार की नाही यात शंका आहे. त्यामुळे अनेक मोठे मोठे ज्वेलर्स डिजिटल मार्केटिंगला प्राधान्य देत आहेत.(gold silver rate today in mumbai)

आज मुंबई मधील सोन्याचा दर 44 हजार 900 रुपये आहे. आज सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. 10 ग्राम सोन्या मध्ये 100 रुपयांची वाढ झाली असून 100 ग्रॅम सोन्यामध्ये 1 हजार रुपयांची वाढ झाली आहे. एप्रिल महिन्यात सोन्याचा दर 8 टक्क्यांनी म्हणजे 3 हजार 600 रुपयांनी वाढला आहे. त्याचबरोबर सोन्याची मागणी वाढली असल्याचे दिसून येत आहे.

24 कॅरेट सोन्याचा दर
1 ग्राम 4 हजार 590 रुपये
8 ग्राम 36 हजार 720 रुपये
10 ग्राम 45 हजार 900 रुपये
100 ग्राम 4 लाख 59 हजार रुपये

22 कॅरेट सोन्याचा दर
1 ग्राम 4 हजार 490 रुपये
8 ग्राम 35 हजार 920 रुपये
10 ग्राम 44 हजार 900 रुपये
100 ग्राम 4 लाख 49 हजार रुपये

आज चांदीच्या दरात घट झाली आहे. आज मुंबईमधील चांदीचा दर प्रतिकिलो 71 हजार 500 रुपये आहे. चांदीच्या दरात 100 रुपयांची घट झाली आहे.

चांदीचे दर
1 ग्राम 71.50 रुपये
8 ग्राम 572.20 रुपये
10 ग्राम 715 रुपये
100 ग्राम 7 हजार 150 रुपये
1 किलो 71 हजार 500 रुपये

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments