आपलं शहर

मुंबईतील दहशतवादी हल्ल्याविरोधी नेतृत्व, अखेर माजी एनएसजी प्रमुख जे. के. दत्तांचे कोरोनाने निधन

राष्ट्रीय सुरक्षा गार्डची माजी प्रमुख आणि आयपीएस अधिकारी जे के दत्त यांचे कोरोनामुळे निधन झाले.

कोरोना संक्रमणामुळे अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्ये अनेक राजकीय नेते, कलाकार, बीएमसी अधिकारी, डॉक्टर, कर्मचारी अशा अनेक लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. राष्ट्रीय सुरक्षा गार्डची माजी प्रमुख आणि आयपीएस अधिकारी जे के दत्त यांचे कोरोना संक्रमणामुळे बुधवारी निधन झाले.

जे के दत्त यांचे गुडगाव येथील रुग्णालयात निधन
जे के दत्त यांच्या कुटुंबीयांनी सांगितले की, त्यांच्या ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यामुळे 14 एप्रिलला गुडगावमधील मेदांता रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबियांनी असे देखील सांगितले की, त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले.(Former NSG chief who led 26/11 Mumbai counter-terror op dies of COVID-19)

जे के दत्त यांची कामगिरी
2008 साली मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी एनएसजी कमांडोचे नेतृत्व जे के दत्त यांनी केले होते. त्याचबरोबर 2006 ते 2009 या कालावधीत ते एनएसजीचे प्रमुख होते. याचबरोबर ते सीबीआयचे संचालक सुद्धा होते. त्यांच्या अकाली निधनाने एनएसजीने शोक व्यक्त केला. जे के दत्त हे 1971 च्या बॅचमध्ये भारतीय पोलिस सेवा अधिकारी होते. त्यांनी सीबीआय आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा येथे विविध पदांवर देखील कार्य केले आहे. दहशतवाद्यांविरोधात चोख प्रत्युत्तर देणाऱ्या जेके दत्त यांची मात्र कोरोना विरुद्धची लढाई अपयशी ठरली.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments