सोने चांदी सुरक्षित ठेवण्याचा हा उत्तम पर्याय; आजचे सोन्या-चांदीचे दर
आज मुंबई मधील सोन्याचा दर 46 हजार रुपये तर चांदीचा दर 71 हजार 200 रुपये आहे.

आज मुंबई मधील सोन्याचा दर 46 हजार रुपये आहे. आज सोन्याच्या दरात वाढ किंवा घट झालेली नाही. एप्रिल महिन्यात सोन्याचा दर 8 टक्क्यांनी म्हणजे 3 हजार 600 रुपयांनी वाढला आहे.
दागिने मुंबईसारख्या शहरात सुरक्षित ठेवायचे असेल तर बँकमध्ये प्रायव्हेट लॉकर्सद्वारे सोने सुरक्षित ठेवू शकतो. सोन्यासारख्या मौल्यवान धातूची किंमत जास्त असल्यामुळे सोने चोरी होण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडतात. सोने चांदी आपल्या घरात लॉकरमध्ये ठेवल्यावर ते सुरक्षित राहतीलच असे नाही. लॉकर तोडून चोरी होण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे बँक ही अशी एक सुरक्षित जागा आहे जिथे आपण आपले दागिने सुरक्षित ठेवू शकता (gold silver rate today in mumbai)
22 कॅरेट सोन्याचा दर
1 ग्राम 4 हजार 600 रुपये
8 ग्राम 36 हजार 800 रुपये
10 ग्राम 46 हजार रुपये
100 ग्राम 4 लाख 60 हजार रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर
1 ग्राम 4 हजार 700 रुपये
8 ग्राम 37 हजार 600 रुपये
10 ग्राम 47 हजार रुपये
100 ग्राम 4 लाख 70 हजार रुपये
आज चांदीच्या दरात घट झाली आहे. मुंबईमधील चांदीचा दर प्रतिकिलो 71 हजार 200 रुपये आहे. आज चांदीच्या दरात 1 हजार 100 रुपये प्रति किलो घट झाली आहे. एप्रिल महिन्यात चांदीच्या दराने 70 हजाराचा टप्पा पार केला होता. परंतु एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत चांदीच्या दरात घट झालेली दिसून येते.
चांदीचे दर
1 ग्राम 71.20 रुपये
8 ग्राम 569.60 रुपये
10 ग्राम 712 रुपये
100 ग्राम 7 हजार 120 रुपये
1 किलो 71 हजार 200 रुपये