Happy Birthday Nawazuddin Siddiqui | पहा नवाजुद्दीन सिद्दीकीचा चित्रपटसृष्टीमधील प्रवास..
नवाजुद्दीन सिद्दीकी याचा चित्रपट सृष्टीमधील आणि खऱ्या जीवनातील संघर्ष..

नवाजुद्दीन सिद्दीकी हा एक भारतीय अभिनेता आहे ज्याने अनेक बॉलीवूड चित्रपटांमध्ये काम केलेले आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी याने आपल्या आयुष्यात खूप संघर्ष केला असून अनेक प्रेक्षकांच्या मनात स्वतःची विशेष छाप सोडली आहे. त्यामुळे नवाजुद्दीन सिद्दीकी याचे भारतातच नव्हे तर इतर देशांमध्ये देखील अनेक चाहते आहेत. आतापर्यंत त्याने अनेक चित्रपटांद्वारे वेगवेगळ्या व्यक्तिरेखा प्रेक्षकांसमोर सादर केले आहेत.
नवाजुद्दीन सिद्दीकी यांचा जन्म 19 मे 1974 साली झाला. 1996 मध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी ने आपले घर सोडले आणि दिल्ली मध्ये येऊन नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून अभिनयाचे शिक्षण पूर्ण केले. अभिनयाचे शिक्षण घेतलेल्या सिद्दिकीने 1999 सालच्या सरफरोश चित्रपटात एक छोटी भूमिका साकारून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ‘मुन्नाभाई एमबीबीएस’, ‘आजा नचले’, ‘न्यू यॉर्क’ इत्यादी चित्रपटांमध्ये त्यांनी छोट्या-छोट्या भूमिका पार पाडल्या.(Happy Birthday Nawazuddin Siddiqui know about his film career)
2012 सली यांना विद्या बालन अभिनेत्री कहानी या चित्रपटातील भूमिकेमुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली. नवाजुद्दीन सिद्दीकी यांना 2012 सली गँग्स ऑफ वासेपूर या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटात त्यांनी फैजल खानची भूमिका साकारली आहे. ज्याला प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दिले. या चित्रपटानंतर नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी बॉलीवूडमध्ये आपला ठसा उमटवला. मांझी द माउंटेन, द लंच बॉक्स, रमण राघव टू, रईस अशा अनेक चित्रपटांमध्ये उत्तम काम केले.
तलाशमधील भूमिकेसाठी त्यांना झी सिने पुरस्कार, स्क्रीन पुरस्कार इत्यादींमध्ये सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्याचे पुरस्कार मिळाले. 2013 सालच्या द लंच बॉक्स चित्रपटासाठी सिद्दीकी यांना फिल्मफेअर सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता पुरस्कार मिळाला. तर 2015 मधील बजरंगी भाईजान, बदलापूर या चित्रपटाद्वारे सिद्दीकी यांची प्रसिद्धी अजूनच वाढली.
2019 च्या हिंदुहृदय बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आधारित ठाकरे या सिनेमात स्वतः बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका बजावली आहे. फक्त चित्रपटांमध्ये नाही तर सिद्दीकी यांनी वेब सिरीज मध्ये देखील आपली कामगिरी बजावली आहे. सेक्रेड गेम्स ही अतिशय प्रसिद्ध हिंदी वेब सिरीज आहे. या वेबसिरीजमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी गणेश गायतोंडे ही व्यक्तिरेखा साकारली. ज्यामुळे सिद्दीकी यांचे व्यक्तिमत्व अभिनयाच्या जगात अजूनच प्रसिद्ध झाले. सेक्रेड गेम्स 2018 मधील लोकप्रिय वेब सिरीज असून ही फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात चर्चिली गेली आहे.
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram