खूप काही

तौक्ते चक्रीवादळाने धारण केले भयाण रूप,केरळ आणि महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

तौक्ते चक्रीवादळाचा महाराष्ट्रासह 5 राज्यांना धोका, गुजरात किनारपट्टीवर धडकण्याची तीव्र शक्यता आहे.

महाराष्ट्रासह पाच राज्यांना ‘तौक्ते ‘ चक्रीवादळाचा (Tauktae cyclone ) धोका असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. अरबी समुद्रात तयार होणारे हे चक्रीवादळ वेगाने तीव्र चक्रीवादळात रूपांतरित झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी तयारी सुरू केली आहे.

‘तौक्ते’ चक्रीवादळाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी उच्चस्तरीय बैठक घेऊन अधिकाऱ्यांना लोकांच्या सुरक्षेसाठी सर्व शक्य उपाययोजना करण्यास सांगितले. यासह, वीज, दूरसंचार, आरोग्य, पिण्याच्या पाण्यासारख्या सर्व आवश्यक सेवांची देखभाल सुनिश्चित करण्याच्या सूचना दिल्या . कोव्हिड व्यवस्थापन, लसींची कोल्ड चेन आणि पॉवर बॅक अप तसेच चक्रीवादळामुळे हॉस्पिटलमध्ये आवश्यक उपचारांसाठी विशेष तयारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

तौक्ते चक्रीवादळाचे वारे ताशी 150 किमी वेगाने वाहतील अशी भीती व्यक्त केली जात आहे. केरळमध्ये गुरुवारी रात्रीपासून पावसाचा जोर कायम आहे तर आज लक्षद्वीपमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.अनेक जिल्ह्यात मदत शिबिरे सुरू करण्यात आली आहेत. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार 18 मे रोजी वादळ गुजरातच्या किनारपट्टीच्या भागाजवळ पोहोचण्याची शक्यता आहे.

गुजरातमध्ये चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफ(NDRF)ची पथके तैनात करण्यात आली आहेत. आज संध्याकाळपर्यंत एनडीआरएफचे 2 पथक गुजरात किनारपट्टीवर तैनात करण्यात येतील असे एनडीआरएफ गांधीनगरचे उप-कमांडर रणविजय कुमार सिंह म्हणाले.

‘तौक्ते’ या राज्यांजवळ येत आहे

‘तौक्ते’ चक्रीवादळ भयानक रुप धारण करून वेगाने गुजरातच्या किनारपट्टीच्या दिशेने वाटचाल करत आहे. यासह, दमण- दीव आणि दादरा- नगर हवेली यांच्या दिशेने देखील पुढे सरसावत आहेत. त्यामुळे पुढील 12 तासात केरळ आणि महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments