कारण

Anil Deshmukh Case : अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ? जयश्री पाटलांना ईडीचे समन्स

अनिल देशमुख प्रकरणात जयश्री पाटलांच्या चौकशीसाठी ईडीने समन्स धाडले आहेत.

Anil Deshmukh Case : अनिल देशमुख प्रकरणात अनेक गोष्टी समोर येत आहेत. या प्रकरणात तक्रारदार जयश्री पाटील यांची चौकशी करण्यासाठी ईडीने (ED) समन्स धाडले आहेत.

तक्रारदार जयश्री पाटील यांना ईडीचे समन्स

अनिल देशमुख यांच्या विरोधात आपला जबाब नोंदवण्यासाठी ईडीने तक्रारदार जयश्री पाटील (Jayashree Patil) यांना समन्स धाडले आहेत. अनिल देशमुख यांच्या विरोधात जयश्री पाटील यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती, त्या याचिकेवर सुनावणी करताना CBI ने यावर गुन्हा दाखल करावा, असा आदेश दिला होता.

CBI ने दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये चौकशी करण्यासाठी ईड सरसावली आहे. अनिल देशमुख यांची चौकशी केल्यानंतर आता तक्रारदार यांचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी जयश्री पाटील यांना बुधवारी, 19 मे रोजी सकाळी 11 वाजता इडीच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

काय आहे प्रकरण

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Former Home Minister of Maharashtra Anil Deshmukh) यांच्यावर 100 कोटी रुपये खंडणी वसूल करण्याचा आरोप मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांनी केला आहे. त्याच आरोपांची चौकशी करण्याठी दिल्लीहून सीबीआयची एक टीम मुंबईत दाखल झाली होती. सीबीआयने परमबीर सिंहांनी केलेल्या आरोपांच्या आधारे आणि उच्च न्यायलयाने दिलेल्या आदेशानुसार अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

उच्च न्यायालयाने 100 कोटींचे वसूली प्रकरण सीबीआय करेल, असे आदेश दिल्यानंतर सीबीआयने यात गुन्हा दाखल केला आहे, मात्र ईडीनेही या तपासात उडी घेतल्यानंतर इडीकडूनही स्वातंत्र गुन्हा या प्रकरणात नोंदवण्यात आला आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments