खूप काही

फक्त दोन तासात चार लोक तयार करतात कोव्हिड-19 हॉस्पिटल

IIT मद्रासच्या स्टार्टअपने २ तासात कोठेही उभारता येईल असे कोव्हीड-19 हॉस्पिटल विकसित केले आहे.

देशात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे सर्वत्र परिस्थिती वाईट होत चालली आहे. दररोज लाखो कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण भेटत आहेत, त्यामुळे देशाच्या आरोग्य यंत्रणेवरचा भार वाढला आहे. हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय उपकरणांची मोठी कमतरता निर्माण झाली आहे.

आरोग्य सेवांवरील ओझे कमी करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी सतत प्रयत्न केले जात आहेत.या दिशेने, आयआयटी मद्रास इनक्युबेटेड स्टार्टअप ‘मॉड्यूल हाऊसिंग’ ने एक पाऊल उचलले आहे आणि कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी मेडिकेअर नावाचे पोर्टेबल हॉस्पिटल युनिट (Portable Hospital Unit) विकसित केले आहे.
आयआयटी मद्रासच्या स्टार्टअपने एक पोर्टेबल कोविड -19 हॉस्पिटल विकसित केले आहे, जे २ तासात कोठेही स्थापित केले जाऊ शकते.

केरळमधील वायनाडमध्ये काम सुरु आहे

‘मेडिकॅब’ नावाच्या पोर्टेबल मायक्रो हॉस्पिटलच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर कोरोनाबाधित रूग्ण सहज ओळखता येतात, चाचणी करता येतात, आणि त्यांच्यावर उपचार करता येतात. मॉड्यूल हाउसिंग असे अनेक माइक्रो हॉस्पिटल विकसित करीत आहे, जे देशभरात वेगाने स्थापित केले जाऊ शकतात. केरळमधील वायनाड जिल्ह्यात नुकतेच मेडिकॅब सुरू करण्यात आले आहे .

4 लोक फक्त 2 तासात हे मायक्रो हॉस्पिटल बनवू शकतात. या हॉस्पिटलमध्ये सर्व सुविधा उपलब्ध असून,याच्या वाहतुकीचा खर्चदेखील कमी आहे. यामध्ये एक डॉक्टर रूम, एक आयसोलेशन कक्ष, एक वैद्यकीय कक्ष आणि दोन खाटांचा आयसीयू आहे.

आयआयटी मद्रास(IIT Madras) च्या स्टार्टअपने या प्रकल्पाच्या चांगल्या कार्यासाठी श्री चित्रा तिरुनल इन्स्टिट्यूट फॉर मेडिकल सायन्सेस अॅण्ड टेक्नॉलॉजीबरोबर भागीदारी केली आहे. 2018 मध्ये आयआयटीचे दोन माजी विद्यार्थी राम रविचंद्रन आणि डॉ. तमस्वती घोष यांच्याद्वारे सुरू झालेल्या स्टार्टअपला आयटीआयटी मद्रासच्या इनक्युबेशन सेलने पाठिंबा दिला आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments