आपलं शहर

Global Tenders : मुंबई पालिकेचं ग्लोबल टेंडर, पण या मोठ्या अडचणींना करावा लागेल सामना

मुंबईकरांना लसीकरण व्हावे यासाठी मुंबई महानगरपालिकेने ग्लोबल टेंडर (Global Tenders) काढण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईत कोरोना लसींचा तुटवडा जाणवत आहे. त्यातही मुंबईकरांची दुसरा डोस घेण्याची वेळ आली असतानाही त्यांना लस मिळत नाही. त्यामुळे हजारो मुंबईकर चिंतेत आहेत. या स्थितीत मुंबईकरांना लसीकरण व्हावे यासाठी मुंबई महानगरपालिकेने ग्लोबल टेंडर (Global Tenders) काढण्याचा निर्णय घेतला आहे. (What can be the problems in the global tender drawn by Mumbai Municipal Corporation)

2 ते 3 महिन्यात लसीकरण पूर्ण
ग्लोबल टेंडरमुळे मुंबईतील लसीकरण (Mumbai Corona Vaccination Update) दोन ते तीन महिन्यात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट पालिकेसमोर आहे. परंतु देशात फक्त कोव्हीशिल्ड आणि कोवॅक्सिन (Covishield and covaxin) या दोन लसींना परवानगी आहे. बाकीच्या लसींना परवानगी नसल्यामुळे ग्लोबल टेंडर वरून समोर ठेवलेले ध्येय पूर्ण होणार का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

मुंबईत लसींचा तुटवडा
मुंबईत कोरोना प्रतिबंधक लसींच्या तुटवड्याची समस्या मिटवण्यासाठी (Vaccine shortage in Mumbai) जागतिक स्तरावर निविदा मागवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. दोन दिवसापूर्वी पर्यावरण मंत्री आणि बृह्ममुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे (Guardian Minister Aditya Thackeray) यांनी पालिका आयुक्तांसोबत बैठक घेऊन ग्लोबल टेंडर विषयी चर्चा केल्यानंतर पालिकेने ग्लोबल टेंडर विषयी परिपत्रक जारी केले. टेंडरच्या माध्यमातून महापालिका तब्बल एक कोटी लस परदेशातून किंवा महाराष्ट्राबाहेर मागवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रक्रियेद्वारे पुढील दोन ते तीन महिन्यात सर्व मुंबईकरांचे लसीकरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट्य पालिकेसमोर आहे.

मुंबईकरांना अजूनही वेट अँड वॉच
मुंबईतील लसीकरण मोहीम पूर्ण करण्यासाठी आणखी काही कालावधी लागणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. लस पुरवण्याचे कंत्राट मिळणाऱ्या कंपनीस तीन आठवड्यात पुरवठा करण्याचे बंधन ठेवण्यात आले आहे. हे डोस उपलब्ध झाल्यानंतर मुंबईकरांची लस तुटवड्याची समस्या दूर होणार आहे. जरी जागतिक टेंडर काढले तरी मुंबई महानगरपालिकेसमोर अनेक आव्हाने उभी असणार आहेत.

काय असू शकतील अडचणी?
जर कोणत्या लसीच्या कंपनीने महापालिकेला लस देण्याची तयारी दर्शवली, तरी त्यासाठी केंद्र सरकारच्या परवानगीची गरज असून जोपर्यंत केंद्रसरकार परवानगी देत नाही तोपर्यंत हे टेंडर पास होणार नाही. त्यामुळे पालिकेला केंद्र सरकारच्या उत्तराचीही वाट पाहावी लागणार आहे.

ज्या राज्यात कोरोनाची रुग्ण संख्या जास्त आहे. अशा राज्यांना आणि प्रामुख्याने मुंबईला लस खरेदी करण्यासाठी केंद्राने आडकाठी न आणता ग्लोबल टेंडरला परवानगी द्यावी, अशी प्रतिक्रिया मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.

मुंबईत 149 केंद्रांवर लसीकरण मोहीम सुरु आहे. येत्या काळात 227 ठिकाणी लसीकरण मोहीम राबवली जाणार आहे. परंतु लसींचा तुटवडा सुरु असलेली केंद्रे बंद पडत असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. यामुळे पालिकेने स्वतंत्र टेंडर काढून नागरिकांना दिलासा देण्याचा विचार केला आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments