खूप काही

IPL 2021 Phase 2 ठरलं! IPL चे बाकीचे सामने होणार, बीसीसीआयने घेतला निर्णय

कोरोनामुले क्रिकेटच्या अनेक सामन्यांमध्ये अडचणी निर्माण झाल्या होत्या, विनाप्रेषक सामने खेळवण्यात आले होते.

IPL 2021 Phase 2 इंडियन प्रीमियर लीग (IPL) 14 मध्ये उर्वरित असलेले 31 सामन्याचे आयोजन सप्टेंबर ते ऑक्टोंबरमध्ये UAE या देशात होणार असल्याची शक्यता आता वर्तवली जात आहे.

या सामन्यांची घोषणा 29 मे रोजी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) विशेष सर्वसाधारण सभेत एसजीएममध्ये (SGM) केली जाऊ शकते. कोरोनामुले क्रिकेटच्या अनेक सामन्यांमध्ये अडचणी निर्माण झाल्या होत्या, विनाप्रेषक सामने खेळवण्यात आले होते, मात्र अचानक अनेक खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यामुळे अखेर IPL स्थगित करण्याचा निर्णय क्रिकेट बोर्डाला घ्यावा लागला होता.

इंग्लड भारत कसोटी सामनाचे नियोजन

इंडियन प्रीमियर लीगचे (IPL) 14 उर्वरित सामने सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे आयोजित केले जाऊ शकतात. मीडिया रिपोर्टनुसार याची घोषणा 29 मे रोजी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) विशेष सभेमध्ये (SGM) केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोरोना काळातील लॉकडॉनमुळे गेल्या वर्षीही आयपीएल युएईमध्ये घेण्यात आले होता.

असं असू शकतं नियोजन

इंग्लंड आणि भारत यांच्यामधील पाच कसोटी सामन्यांची मालिका 4 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. दुसर्‍या आणि तिसर्‍या कसोटी सामन्यांमध्ये 9 दिवसाचे अंतर असल्याची शक्यता आहे. अहवालानुसार त्या नऊ दिवसांमधील बीसीसीआयच्या दुसऱ्या कसोटी आणि तिसर्‍या कसोटीमधील अंतर कमी 4 दिवस करण्याची शक्यता आहे. यामुळे बीसीसीआयला मधल्या कालावधीत आयपीएलसाठी अधिक वेळ मिळेल. बीसीसीआयने अद्यापही कोणत्याच प्रकारची औपचारिक विनंती इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाला ईसीबी (ECB) केलेली नाही. (ipl’s planning can be like this)

BCCI ला करावी लागणारी व्यवस्था

भारतातील इंग्लंडचा दौरा 14 सप्टेंबरला संपलेला असेल. अशा परिस्थितीत कदाचित भारत-इंग्लंड मालिकेत कोणताही बदल झाला नाही, तर बीसीसीआयकडे टी-20 विश्वचषक होण्यापूर्वी एक महिन्याची (१५ सप्टेंबर -15 ऑक्टोबर) जागा असेल आणि तसेच या तीस दिवसात भारत आणि इंग्लंड क्रिकेटर्सला ब्रिटेन आणण्यासाठी एक पूर्ण दिवस वेगळा द्यावा लागेल तसेच या सामन्यात बाद असनाऱ्या फेरीसाठी 5 दिवसांचा कालावधी निश्चित करावा लागणार आहे. तर या काळात भारतीय मंडळाला 27 सामने पूर्ण करण्यासाठी 24 दिवसांचा कालावधी शिल्लक राहील. यूएई मधील या विंडोमध्ये शनिवार-रविवारचे 8 दिवस आहेत. याचा अर्थ असा आहे की डबल हेडरनुसार शनिवार आणि रविवारी 16 सामने खेळवले जाऊ शकतात. अशाप्रकारे उर्वरित 19 दिवसांत 11 सामने आयोजित केले जाऊ शकतात. (Arrangements to be made by BCCI)

बीसीसीआयचे नुकसान

आयोजित केलेल्या आयपीएलमध्ये जर आयपीएलने 14 व्या हंगामात पुन्हा सुरुवात न केल्यास बीसीसीआयला सुमारे 3000 कोटी रुपयांच्या नुकसानाची झळ सहन करावी लागणार आहे. त्यामुळे बीसीसीआयला अशा प्रकारचा अवघड अडथळा निर्माण होण्याआधी कोणत्याही परिस्थितीत 14 वे हंगाम पूर्ण करायचे आहे. त्यांना आशा आहे की टी -20 विश्वचषक स्पर्धेची जोरदार तयारी पाहून परदेशी खेळाडूदेखील आयपीएलमध्ये भाग घेतील. महत्त्वाचे म्हणजे आयपीएलचा 14 व्या हंगामला 9 एप्रिलपासून सुरू झाला होती. देशात आणि परदेशांत चाललेल्या या महामारीत काही खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आल्यानंतर आयपीएलचे पुढील सर्व सामने स्थगित करावे लागले होते. आयपीएलमध्ये स्पर्धा तहकूब होईपर्यंत एकूण 29 सामने खेळले गेले असे आपल्या दिसण्यात आलेले आहे.(Loss of BCCI)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments