Corona poem : कोरोनाची कवीता आवडली म्हणून थेट होर्डिंग छापून लावले चौकात, जाणुन घ्या संपूर्ण माहिती….
कोरोनाची कवीता आवडली म्हणून मुंबईच्या जुहू सिग्नलवर लावण्यात आले एक मोठे होर्डिंग.

- Corona poem : जागतिक महामारी कोरोनामुळे(corona) सर्वत्र निराशतेचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत सर्व लोक एकमेकांमध्ये आशेचे आणि प्रोत्साहनाचे किरण भरण्याचा प्रयत्न करीत आहेत.मग ते सोशल मीडिया असो किंवा इतर कोणतेही साधन. यातच मुंबईच्या जुहू सिग्नलवर (juhu) एक मोठे होर्डिंग लावण्यात आले आहे. या होर्डिंगवर लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी आणि कोरोनाचा सामना करण्यासाठी एक सुंदर कविता लिहिलेली आहे.(Corona’s poem so the hoardings were printed directly)
जुहू सिग्नलवर लावलेल्या होर्डिंगवर असलेली कविता ही बॉलिवूडशी संबंधित अभिनेत्री पौर्णिमा पटवर्धन (paurnima patvardhan) यांनी लिहिली आहे. कोरोनाच्या साथीमुळे पौर्णिमा यांनी आपल्या अनेक जवळच्या व्यक्तींना गमावले.त्यामुळे त्यांनी अत्यंत दुःखी मनाने ही कविता लिहून त्यांचे सोशल मिडिया हँडल वर पोस्ट केली होती.कविता वाचल्यानंतर त्यांच्या चाहत्यांना ती इतकी आवडली की त्यांनी कवितेचे होर्डिंग छापून पौर्णिमा पटवर्धन यांच्या घरासमोरील रस्त्यावर लावले.
पौर्णिमा यांच्या मित्रांनी त्यांना फोनवर या होर्डिंगबद्दल सांगितले आणि त्यानंतर हे भले मोठे होर्डिंग प्रत्यक्षात पाहिल्यावर क्षणभरासाठी त्या हतबल झाल्या परंतु पौर्णिमा यांना या गोष्टीचा आनंद देखील झाला की त्यांनी लिहिलेल्या या ओळींमधून अनेकांना कोरोनाशी संघर्ष करण्यासाठी धैर्य मिळेल आणि कोरोनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यासाठी प्रोत्साहन देखील मिळेल.