आपलं शहर

मुंबईचा अनलॉक कसा असेल, पाहा पालकमत्र्यांनी दिली ठसठशीत माहिती

50% जनतेचे लसीकरण पूर्ण झाले तरच लॉकडाऊन कमी करण्यात येईल.

मुंबईमधील कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता 1 जूननंतर लॉकडाऊन वाढणार का? यासंदर्भात अस्लम शेख यांनी सांगितले की, लॉकडाऊन संदर्भात सरकार योग्य तो निर्णय घेईल.

लॉकडाऊन संदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे 15 मेपर्यंत लॉकडाऊन करण्यात आले होते. परंतु ते 1 जुन पर्यंत वाढवण्यात आले. आता लॉकडाऊन संपायला मोजकेच दिवस बाकी आहेत. अशावेळी लॉकडाऊन संपणार की वाढणारे याबद्दल अजुनही शंका आहे. अशावेळी मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी सांगितले की, लॉकडाऊन शिथीलते संदर्भात कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला जाईन.(The decision regarding lockdown will be taken in the cabinet)

50% जनतेचे लसीकरण झाले तरच लॉकडाऊन कमी करण्यात येईल
अस्लम शेख यांनी सांगितले की, 50% जनतेचे लसीकरण पूर्ण झाले तरच लॉकडाऊन कमी करण्यात येईल. त्याचबरोबर हॉटेल, इंडस्ट्री, सलुन, इलेक्ट्रॉनिक्स व्यवसाय यांना 1 जूनपासून दिलासा दिला जाऊ शकतो. परंतु पूर्णपणे लॉकडाऊन उठवता येणार नाही. पुन्हा सर्व अनलॉक केले गेले तर परत परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. त्यातच कोरोनाची तिसरी लाट कधीही येऊ शकते. त्याची पूर्वतयारी सध्या चालू आहे. बालचिकित्सालय कोविड सेंटर आरक्षित केले जात आहे.(Lockdown will be reduced only if 50% of the population is vaccinated)

वादळाने नुकसान झालेल्यांना भरपाई देण्यात येईल
तोक्त चक्रीवादळाबद्दल त्यांनी असे सांगितले की, ज्यांचे ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांच्या पंचनाम्याचे आदेश देण्यात आले होते. पंचनामा पूर्ण झाल्यावर ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांना भरपाई देण्यात येईल.(Those affected by the storm will be compensated)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments