आपलं शहर

maharashtra lockdown extension : 1 जूननंतर लॉकडाऊन वाढणार? मुख्यमंत्र्यांनी दिलं पत्रकारांना उत्तर…

लॉकडाऊन संदर्भातील निर्णय योग्य वेळी घेण्यात येईल..

सध्या महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे नोकऱ्या, उद्योगधंदे, दुकानं कधीपर्यंत सुरू होणार हे अध्याप माहीत नाही. 1 जूनला लॉकडाऊन(Lockdown update) संपणार आहे. उद्धव ठाकरे यांना लॉकडाऊन संदर्भात काही प्रश्न विचारले गेले त्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी काहीच व्यक्तव्य केलेले नाही.

लॉकडाऊन संपणार की वाढणार?
कोकण दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) यांना रत्नागिरीत मीडियाशी बोलताना लॉक डाऊन संपणार की वाढणार? असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी असे सांगितले की, कोरोना कमी होतोय परंतु कोरोनाच्या दुसऱ्याला लाटेतील कोरोनाचे विषाणू मागच्या वेळच्या तुलनेत घातक आहे. हे विषाणू अत्यंत वेगाने पसरत आहे.(maharashtra lockdown extension: Lockdown will increase after June 1? The Chief Minister replied to the journalists …)

कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी आपण कोरोनावर नियंत्रण मिळवलं होतं. पण काही दिवसांनी कोरोना चौपटीने वाढला. मागील अनुभवातून आपल्याला शहाणं व्हावं लागेल. त्यामुळे लॉकडाऊन वाढणार की नाही त्यावर मी आत्ता काहीच बोलणार नाही.

लॉकडाऊन संदर्भातील निर्णय योग्य वेळी घेण्यात येईल
मागील महिन्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत होती. परिस्थिती हाताबाहेर गेली होती त्यामुळे अनेकांचा कोरोनाने मृत्यू झाला होता. परंतु सध्या राज्यातील परिस्थिती आटोक्यात आली असून लॉकडाऊन संदर्भातील निर्णय योग्य वेळी घेण्यात येईल.(Decisions regarding lockdown will be taken in due course)

महाराष्ट्रात म्युकरमायकोसीस(mucormycosis) रुग्णांची वाढ
सध्या महाराष्ट्रात म्युकरमायकोसीसचे(mucormycosis) रुग्ण देखील मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. या आजारावर देखील औषध मिळण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी गाफील राहू नये. संयम दाखवावा आणि स्वतःची काळजी घ्यावी व नियमांचे पालन करावे असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले.(Increase in mucomycosis patients in Maharashtra)

कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 99.43%
कोरोना रुग्णांची वाढती संख्या आता कमी झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 99. 43% वर येऊन पोहोचले आहे. महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या 8 लाख 83 हजार 253 आहे. महाराष्ट्रात गुरुवारी 19 हजार 911 रुग्णांच्या वाढ झाली असून 47 हजार 371 रुग्ण बरे झाले आहेत व 5026308 रुग्ण बरे होऊन घरी पाठवण्यात आले आहेत.(Corona patient cure rate 99.43%)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments