आपलं शहर

Maharashtra corona update:लाॅकडाऊनचा निर्णय ठरला सकारात्मक, कोरोनाच्या रुग्णसंख्येत होतेय झपाट्याने घट..

एप्रिल महिन्यात लॉकडाऊन लावण्यात आल्याने कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आली

Maharashtra corona update :गेल्या अनेक महिन्यांपासून आपण कोरोनाच्या महामारीसोबत संघर्ष करत आहोत. कोरोनाच्या पहिल्या लाटेत झालेल्या जीवितहानीनंतर कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने अधिक भयानक रुप दाखवले. 2020 च्या शेवटी शेवटी आटोक्यात आलेली कोरोनाची रुग्णसंख्या फेब्रुवारीत पुन्हा डोके वर काढू लागली आणि त्यानंतर मार्च व एप्रिल पासून राज्य सरकारने निर्बंध लावण्यास सुरुवात केली.

कोरोना आणखी वाढू नये यासाठी राज्य सरकारने एप्रिलमध्ये लॉकडाऊन जाहीर केला.लॉकडाऊनपूर्वी कोरोना रुग्णांची दैनंदिन सरासरी दहा ते अकरा हजारांच्या घरात गेली होती परंतु एप्रिल महिन्यात लॉकडाऊन लावण्यात आल्याने कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आली.तर आता मुंबईतील कोरोना रुग्णांच्या संख्येत हळूहळू उतार येत असून गेल्या 24 तासात 1431 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून राज्य सरकार कोरोनावर मात करता यावी म्हणून प्रयत्न करत आहे तर त्यांच्या प्रयत्नांमध्ये पालिका प्रशासन देखील हातभार लावत आहे. येणाऱ्या काळात पालिकेच्या आणि राज्य सरकारच्या सूचना पाळल्या तर नक्कीच आपण कोरोणाच्या महामारीवर मात केली जाऊ शकते.

मुंबईच्या विभागातील रुग्ण दुपटीचा कालावधी पाहूया

लॉकडाऊन लावण्या अगोदर मुंबईतील रुग्ण दुपटीचा सरासरी दर 40 दिवसांवर येऊन ठेपला होता.पण आता रुग्ण दुपटीचा सरासरी कालावधी 331 दिवसांवर पोहचला आहे.त्यात मरीनलाईन्स परिसरात सर्वाधिक म्हणजे 539 आणि त्यापाठोपाठ मुलुंडमध्ये सरासरी कालावधी 508 दिवस एवढा नोंदविला गेला आहे. कोरोना रुग्णात घट आणि रुग्ण दुपटीचा कालावधी या दोन्ही गोष्टी एकमेकांशी निगडित आहेत.

तज्ज्ञांच्या मते संख्या कमी होते म्हणून निष्काळजीपणा करू नये तीसरी लाट येण्याची संभावना आहे आणि येणाऱ्या लाटेचा फटका लहान मुलांना बसणार आहे त्यामुळे त्रिसूत्री कार्यक्रम राबवणे गरजेचे आहे तसेच संख्या कितीही कमी झाली अगदी शून्यावर आली तरी मास्क घालणे गरजेचे आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments