फेमस

Maidaan Release new : अजय दैवगनचं मैदान गाजणार का? व्हायरल चर्चांना उधाण

मैदान" हा सिनेमा थेटरमध्ये होणार रिलीज. सिनेमाबद्दल कोणत्याही प्रकारची माहिती हवी असल्यास आमचाकडे चौकशी करा, कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरवू नका, असं निर्मात्यांनी केले स्पष्ट.

देशात कोरोनाचे संकट मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. या काळात जाहीर केलेल्या लॉकडाऊनचा परिणाम शूटिंग आणि सिनेमा थिएटर यांच्यावरही होत आहे. थिएटर बंद असल्याने अनेक सिनेमे ओटीटी प्लॅटफॉर्मवर ऑनलाइन माध्यमातून जनतेला उपलब्ध करण्यात आला आहे. (Maidaan Release new Ajay Devgn’s ‘Maidaan’ To Release Directly On OTT)

नुकताच रिलीज झालेला सलमान खानचा “राधे” हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात आला, काही तासातच राधेला चांगला प्रतिसाद मिळाला असल्याने अनेकांचा कल आता ओटीटी प्लॅटफॉर्मकडे वळला आहे. (Maidaan Release new)

अजय देवगनच्या मैदान या चित्रपटाबाबतही अशीच चर्चा सुरु आहे. अजय देवगनच्या अनेक चाहत्यांनादेखील हा चित्रपट लवकर प्रदर्शित व्हावा अशी इच्छा आहे, मोठ्याप्रमाणावर उत्सुक आहेत. परंतु ही एक अफवा आहे असे मैदान या सिनेमाचे मेकर्स यांनी सांगितले.

सिनेमाचे मेकर्स यांचे निवेदन
“मैदान” हा सिनेमा थेटरमध्ये रिलीज होणार आहे. तसेच ओटीटी प्लॅटफॉर्मवर सिनेमा रिलीज होण्याची कोणतीही चर्चा झालेली नाही, तसेच विव्यूज रिलीजची कोणतीही योजनाही केलेली नाही, या काळात आमच्या सर्वांचे लक्ष केवळ सुरक्षिततेवर आणि नियमांचे पालन करण्यात आहे. सिनेमाबद्दल कोणत्याही प्रकारची माहिती हवी असल्यास आमचाकडे चौकशी करा, कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरवू नका, असं निर्मात्यांनी स्पष्ट केले आहे.

मैदान सिनेमा टीमवर्क
मैदान हा सिनेमा स्पोर्ट जीवनपट असून अजय देवगण यांच्या पहिला स्पोर्ट सिनेमा आहे, हा सिनेमा बोनी कपूर, आकाश चावला, अरुण जॉय यांनी प्रोड्यूस केलेला आहे. हा सिनेमा भारताचे राष्ट्रीय टीमचे कोच सय्यद अब्दुल रहीम यांच्या जीवनावर आधारित आहे. (Ground cinema teamwork)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments