खूप काही

Mumbai to Dubai : विमानात 360 जागा, मात्र संपूर्ण प्रवासात फक्त एकटाच, पाहा भन्नाट कारण

बईचा रहिवासी असलेला भावेश आपल्या व्यवसायाच्या संदर्भात मेच्या पहिल्या आठवड्यात मुंबईला आला होता.

दुबईचा रहिवासी असलेला भावेश आपल्या व्यवसायाच्या संदर्भात मेच्या पहिल्या आठवड्यात मुंबईला आला होता.

काम संपवण्यासाठी आणि दुबईला परत जाण्यासाठी विमानाचं बुकींग 10 दिवस अगोदर केले होते. बरेचदा ते व्यवसाय वर्गातून (businessclass) प्रवास करतात. पण कोरोनामुळे सध्या विमानात गर्दी नसेल, असं त्यांना वाटलं. म्हणून या महाशयांनी इकॉनॉमी क्लासचे तिकीट बूक केलं आणि 18 हजार रुपयांत मुंबई ते दुबईचे तिकिट बुक झालं.

19 मे रोजी सकाळी 4.30 वाजताची विमानाची वेळ होती. आंतरराष्ट्रीय उड्डाण नियमांनुसार तो मध्यरात्री विमानतळावर पोहोचला. चेक इन करताना एक गोष्ट जेव्हा त्या तरुणाला समजली तेव्हा तो थोड्या वेळेसाठी शॉक झाला. तो स्वत: 360 सीट्स मधल्या विमानात एकटा असणार होता. यावर त्याचा विश्वास बसला नव्हता. तो एकटा विमान प्रवास करणारा एकमेव माणूस आहे.

तो गेली 20 वर्षे दुबईत राहत आहे. मुंबई ते दुबई दरम्यान त्याने अनेक वेळा प्रवास केला, पण त्याच्यासोबत असा प्रकार घडण्याची ही त्याची पहिली वेळ होती.

दुबईहून बीबीसीशी बोलताना तो म्हणतो की “मी सामान्यपणे व्हिडीओ कधी करत नाही. मी कॅमेर्‍यावर येण्यासही धजावतो, पण मी माझ्या मोबाईलवर ही संपूर्ण ट्रिप शूट केली. मी ही आठवण कायमची जपून ठेवेन आहे. चेक इनपासून ते अगदी दुसर्‍या दिवशी प्रवासाचा शेवट होईपर्यंत सगळं मी शूट करत होतो. अमिरेट्सच्या फ्लाइट कर्मचाऱ्यांसाठी देखील ही एक वेगळाच प्रसंग होता. विमानात चढल्यावर चालक दल सदस्यांनी टाळ्या वाजवून स्वागत केले. पायलट स्वत: मला भेटण्यासाठी कॉकपिटमधून बाहेर आला.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments