आपलं शहर

MCGM Recruitment 2021; बृहन्मुंबई महानगरपालिकेत पॅरामेडिकल पदांसाठी भरती, 28 मे अर्ज भरण्याची शेवटची तारीख

प्रयोगशाळेतील तंत्रज्ञ (laboratory technicians) आणि औषध विक्रेत्यांच्या (pharmacist) पदांसाठी भरती; 185 जागा रिक्त

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (municipal corporation of greater mumbai) अनेक पदांसाठी वेकेन्सी काढली आहे. प्रयोगशाळेतील तंत्रज्ञ (laboratory technicians) आणि औषध विक्रेत्यांच्या (pharmacist) पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

एकूण 185 जागा सध्या रिक्त आहेत. त्यामुळे उमेदवार या पदांसाठी ऑनलाईन रजिस्टर करू शकतात. ऑनलाइन अर्ज @portal.mcgm.gov.in या वेबसाईटद्वारे भरू शकतो. या पदांच्या अर्जाची शेवटची तारीख 28 मे 2021 असून फॉर्ममध्ये काही गडबड आढळल्यास अर्ज नाकारला जाईल.(MCGM recruitment 2021 for paramedical post)

बृहन्मुंबई महानगरपालिकेने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार उमेदवारांचे वय 18 ते 65 असेल तरच अधिक माहितीसाठी उमेदवाराने अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी. त्याचबरोबर फार्मासिस्ट पदासाठी ऑनलाईन अर्ज करणाऱ्या उमेदवारांची बीफार्म पदवी असणे आवश्यक आहे. फार्मासिस्ट उमेदवारांना अठरा हजार पगार मिळणार असून प्रयोग शाळेतील तंत्रज्ञानासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना देखील 18 हजार पगार मिळणार आहे. प्रयोगशाळेतील तंत्रज्ञानासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची बीएससी पदवी असणे गरजेचा आहे.

त्याचबरोबर चेन्नई मेट्रो रेल लिमिटेड(chennai metro recruitment) यांनीदेखील चेन्नई मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी विविध पदांची भरती काढली आहे. यासाठी ॲडिशनल जनरल मॅनेजर, जनरल मॅनेजर आणि डिपटी जनरल मॅनेजर या आठ पदांची भरती काढण्यात आली आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments