फेमस

Mumbai police: Money heist चा व्हिडिओ शेअर करून मुंबई पोलिसांनी दिला अनोखा मॅसेज

मुंबई पोलीस सोशल मीडिया माध्यमातून कायमच मजेशीर पोस्ट करत असतात. या वेळी देखील त्यांनी मजेशीर पोस्टमधून एक संदेश दिला आहे.

मुंबई पोलीस(mumbai police) आपल्या सोशल मीडियामार्फत लोकांना जागरूक करण्यासाठी नवनवीन मजेदार पोस्ट शेअर करत असतात. यात बॉलिवूड फिल्म, पोस्टर, डायलॉग्स घेऊन अगदी मजेशीर पद्धतीने पोस्ट बनवल्या आहेत.

इंस्टाग्राम, ट्विटर(instagram, twitter) या माध्यमातून मुंबई पोलीस कायम नवनवीन गोष्टी शेअर करत असतात व त्या गोष्टी सामान्य नागरिकांना देखील आवडत असतात. त्यामुळे मुंबई पोलीस या अकाउंटचे फॉल्लोवर्स देखील खूप आहेत. यावेळी देखील त्यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ मनी हाइस्टचा (money heist) आहे.

व्हिडिओमध्ये डॅनवर आणि आर्टूरो आहेत. आणि या व्हिडीओचे कॅपशनमध्ये असे लिहिले आहे की, ‘दिस इज आर्टूरो. आर्टूरो थिंक्स ही इज व्हेरी स्मार्ट. आर्टूरो किप्स 1234 हिज पिन. डोन्ट बी लाइक आर्टूरो’.(This is Arturo. Arturo thinks he is very smart.Arturo keeps 1234 as his PIN. Don’t be like Arturo)

 

View this post on Instagram

 

A post shared by Mumbai Police (@mumbaipolice)

व्हिडिओ शेअर करण्यामागचा उद्देश
हा व्हिडिओ शेअर करण्यामागे पोलिसांचा उद्देश असा आहे की, कधीही कोणाला आपला पिन सांगू नका आणि त्याचबरोबर पिन कधीही सोपा ठेवू नका. या व्हिडिओला देखील सोशल मीडियावर लोकांनी खूप जास्त शेअर केला आहे. ‘मुंबई पोलीस फक्त शहराचे संरक्षण करत नाहीत तर लोकांचा मूड फ्रेश करायचे काम देखील ते करतात’ अशी कमेंट एका युजरने केली आहे.(The purpose behind video sharing)

दुसरा सिजन होणार दोन भागांमध्ये रिलीज
त्याचबरोबर पोलिसांना देखील ट्रेंडबद्दल माहीत असल्याने मनी हाइस्ट शोची व्हिडिओ त्यांनी पोस्ट केली आहे. काही दिवसांपासून मनी हाइस्ट हा शो खूप जास्त प्रसिद्ध झाला आहे आणि या शोचा शेवटचा सिजन लवकरच येणार आहे. या शोचा शेवटचा सिझन दोन भागांमध्ये येणार आहे. पहिला भाग सप्टेंबरला रिलीज होणार असून दुसरा भाग डिसेंबरमध्ये रिलीज होणार आहे.(The second season will be released in two parts)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments