आपलं शहर

Mumbai Corona Model : जपानला मुंबई मॉडेलचा सल्ला, पाहा आनंद महिंद्राच्या व्हायरल ट्विटमध्ये काय म्हटलय…

उद्योगपती आनंद महिंद्रा (Aanand mahindra) यांनी तेथील अधिकाऱ्यांना ‘मुंबई मॉडेल’ला (mumbai model) फॉलो करण्याचे आवाहन केले आहे.

Mumbai Corona Model : जपान सध्या कोरोनाच्या नव्या लाटेशी लढत आहे. दरम्यान, उद्योगपती आनंद महिंद्रा (Aanand mahindra) यांनी तेथील अधिकाऱ्यांना ‘मुंबई मॉडेल’ला (mumbai model) फॉलो करण्याचे आवाहन केले आहे. आनंद महिंद्रा म्हणाले की प्रत्येकाने हे समजून घेतले पाहिजे की संपूर्ण जगाला कोरोनाच्या महामारीतून वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्ररित्या प्रयत्न केले पाहिजे. तरच कोरोनाचा पराभव होऊ शकतो. (Mumbai corona model’s advice to Japan what Anand Mahindra viral tweet)

तसेच महिंद्रा सोशल मीडियाच्या माध्यमातून कोरोनाबद्दल नियमित चर्चा करत असतात आणि इतरांनीही या कठीण परिस्थितीत मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे अशी सूचना देत असतात, त्यातच त्यांनी सतत भारताला दोष देणाऱ्यांनाही उत्तर दिलं आहे.

आनंद महिंद्रा यांनी मंगळवारी अहवालाद्वारे सांगितले की, जपानच्या ओसाका, जे मुंबईसारखेच एक मोठे शहर आणि व्यावसायिक केंद्र आहे, तिथे कोरोनामुळे हॉस्पिटलमध्ये बेड आणि व्हेंटिलेटरची कमतरता भासत आहे, त्यामुळे मुंबई मॉडेलचे अनुकरण जपानमध्ये व्हावे असे आनंद महिंद्रा यांनी त्यांनी पर्याय सुचवला आहे.

जपानमध्ये कोरोना वाढतोय, त्यामुळे जपान असो वा भारत कोण कुठेही सुरक्षित नाही, याक्षणी आपण सगळ्यांनी एकत्र येऊल लढाई लढली पाहिजे, आणि खासकरून जपानच्या ओसाका शहराने मुंबई मॉडेल समजून घेऊन त्याप्रमाणे काम करायला हरकत नाही, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

महाराष्ट्र सरकारनेही परिस्थितीचे नियमित निरीक्षण करण्यासाठी डॅशबोर्ड तयार केला आहे. याचे अनेकांनी कौतुक केले आहे. या महिन्याच्या सुरुवातीला आनंद महिंद्रा यांनी केलेल्या ट्विटमध्ये फेब्रुवारी महिन्यात मुंबईत कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढू लागले होते. 4 एप्रिल रोजी, शहरात 11 हजार 206 नवीन प्रकरणांची एक दिवसीय नोंद झाली होती. परंतु मेच्या सुरूवातीपासूनच शहरातील कोव्हिडच्या रुग्णांमध्ये घट झाली आहे.  (Mumbai corona model’s advice to Japan what Anand Mahindra viral tweet)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments